कोल्हापूर 4/7/26 युवा नेते मा. श्री. पुष्कराज राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा हाच खरा उत्सव या संकल्पनेला अनुसरून, प्रभाग क्र. ३ च्या नगरसेविका मा.सौ. वंदना विश्वजीत मोहिते, शिवसेना उपशहर प्रमुख मा.श्री. विश्वजीत बाबासाहेब मोहिते व मा.श्री. समरजीत मोहिते यांच्या माध्यमातून प्रभाग क्र. ३ मधील कोल्हापूर महानगरपालिकेच्या अहोरात्र सेवा बजावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात सुरक्षितपणे व सोयीस्कररीत्या आपले कर्तव्य पार पाडता यावे, यासाठी रेनकोटचे वाटप करण्यात आले.
दिवस-रात्र, ऊन-पाऊस याची पर्वा न करता शहर स्वच्छ, सुंदर व निरोगी ठेवण्यासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अनमोल आहे. त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या सेवेला सलाम करण्यासाठी हा छोटासा उपक्रम आयोजित करण्यात आला.
समाजाप्रती असलेली बांधिलकी, सेवाभाव आणि जनकल्याणाची भावना जपत अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कायम कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी प्रभाग क्र. ३ चे नगरसेवक मा. श्री. विजयेन्द्रसिंह माने, नगरसेवक मा. श्री. प्रमोद देसाई, सामाजिक कार्यकर्ते महेश महाडिक, मा. सौ. अनुराधा मोहिते, शिवसेना उपशहर प्रमुख मा. श्री. मुकुंद सावंत, विभाग प्रमुख मा. श्री. संदीप चिगरे, सामाजिक कार्यकर्ते संजय लकडे, युवासेना सरचिटणीस विपुल भंडारे, सतीश भोसले, वैष्णव गवळी आदित्य शिंदे, अभिषेक पाटील, अमीत गवळी कोल्हापूर महानगरपालिकेचे सॅनिटरी इन्स्पेक्टर, मुकादम तसेच सर्व सफाई कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या