Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

*TET पेपरफुटीच्या निषेधार्थ अभाविपचे छत्रपती शिवाजी चौकात निदर्शने



वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

कोल्हापूर | दि. २७ जून २०२६

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगरच्या वतीने आज सायंकाळी ६.०० वाजता छत्रपती शिवाजी चौक, कोल्हापूर येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी विद्यार्थी कार्यकर्त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा निषेध व्यक्त केला.


यावेळी बोलताना अभाविपचे जिल्हा सहसंयोजक प्रेम राजमाने यांनी वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त करत, "NEET नंतर आता TET... आता पुढचा कोणता पेपर फुटणार?" असा सवाल शिक्षण प्रशासनाला केला. तसेच, "वारंवार होणाऱ्या पेपरफुटीला जबाबदार कोण? या घटनांमुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक ताण निर्माण होत असून, टोकाची पावले उचलण्यास भाग पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिस्थितीला जबाबदार कोण?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला व TET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, केवळ आरोपी नव्हे तर संपूर्ण रॅकेटमागील मुख्य सूत्रधारालाही जनतेसमोर आणून कठोर शिक्षा द्यावी, परीक्षा प्रक्रियेतील निष्काळजीपणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शक व सुरक्षित व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी अभाविपच्या वतीने करण्यात आली.

यावेळी अभाविपचे जिल्हा सहसंयोजक प्रेम राजमाने, अभय शेलार, साहिल पाटील, पूर्वा कुलकर्णी, पार्थ पाटील, पार्थ डाकवे तसेच अन्य विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या