Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

करवीर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची कारवाई गोवा बनावटीची दारू जप्त


वैधरित्या गोवा बनावटीची बिदेशी दारुची बिक्री करणारे इसमास पकडुन त्याचे कब्जात ६३,८४०/- रुपयाची गोवा बनावटीची विदेशी दारु जप्त करवीर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची कारवाई

पोलीस अधीक्षक श्री नीलोत्पल सो यांनी कोल्हापूर जिल्हयातील अवैध्य व्यवसायाबाबत माहिती मिळून कठोर कारवाई करून अवैध्य व्यवसायाचे समुळ उच्चाटन करणेबाबत सर्व पोलीस ठाणे अधिकारी यांना सुचना दिलेल्या होत्या.

            Click below to see video

मा. पोलीस अधीक्षक सो यांनी दिले सुचनाप्रमाणे करवीर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना माहिती मिळाली की, मांढरे, ता करवीर येथे सर्जेराव जगताप हा अवैध्यरित्या बिगरपरवाना, बेकायदेशिरत गोवा बनावटीचे विदेशी दारुची विक्री करीत आहे अशी माहिती मिळालेने ती माहिती मा पोलीस निरीक्षक सो यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांना दिली व सदरचा इसम मिळून आलेस त्याचेवर कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.

त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार हे मिळाले माहिती प्रमाणे मांढरे, ता करवीर गांवात गेलेवर पोहेकॉ १८७२ सुभाष सरवडेकर यांनी त्याची खात्री केली की, विजय मारुती पोवार यांचेजनावराचे गोठ्यामध्ये सर्जेराव जगताप हा चोरुन गोवा बनावटीची दारुची विक्री करीत आहे. त्याप्रमाणे

मिळाले बातमीची खात्री झालेनंतर पोलीस अंमलदार मांनी विजय पोवार यांचे गोठ्याचे अलीकडे थांबुन थोडा वेळ पाळत ठेवली असता जनावरांच्या गोठ्याचे बाहेर एक इसम हा पुड्यात दारुचे खाकी रंगाचे बॉक्स घेऊन बसलेला दिसला व त्याचेकडे लोकांची ये जा होताना दिसली. सदरचा इसमाचा संशय आलेने त्यास छापा टाकुन पकडले. त्यास त्याचे नांव व पत्ता विचारले असता त्याने आपले नांव सर्जेराव सखाराम जगताप, क्य ४०, रा मांडरे, ता करवीर, जि कोल्हापूर असे असलेचे सांगितले व त्याचे कडे महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेले गोवा बनावटीचे विदेशी दारुचे बॉक्स असा एकुण   ६३,८४० /- रुपयाचा माल मिळून आला तो पंचनामा करुन ताब्तया घेतला, तसेच सर्जेराव जगताप याचेकडे अधिक चौकशी केली असता तो व त्याचा साथीदार विजय मारुती पोवार असे दोघेजण मिळून अवैध्य गोवा बनावटीची दारुची विक्री करीत असल्याचे सांगितले, त्यामुळे 

१) सर्जेराव सखाराम जगताप, वय ४०, रा मांढरे, ता करवीर, जि कोल्हापूर व

२) विजय मारुती पोवार, यय ३९, रा. माळवाडी, मांढरे, ता करवीर जि कोल्हापूर यांना ताब्बेत घेऊन त्यांना पोलीस ठाणेस आणले व त्याचेविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.

सदर गुन्हयाचा तपास पोहेको १८०० विजय तलसकर हे करीत आहेत. सदरची कारवाई ही कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल सो, अपर पोलीस अधीक्षक, अण्णासाहेव जाधव सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, मा. आप्पासो पवार सो यांचे मार्गदर्शनाखाली

करवीर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार सुभाष सरवडेकर, विजय तळसकर, सोमराज पाटील, विजय पाटील, अमोल चव्हाण, रणजित पाटील, प्रकाश कांबळे यांनी केलेली आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या