महाराष्ट्र राज्यात लिक झालेल्या टीईटी - TET पेपर घोटाळ्याविरोधात निषेध आंदोलन...
कोल्हापूर दि २८ जुन -महाराष्ट्रात दिनांक 27 जून 2026 रोजी टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपर फुटी विरोधात
आज रविवार दिनांक २८ जून २०२६ रोजी सायंकाळी ५-३० वाजता *छत्रपती शिवाजी महाराज चौक* येथे कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या व शिक्षण विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन निषेध आंदोलन करण्यात आले. अगोदरच नीट पेपर फुटीमुळे देशभरातील विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असताना व पेपर फोडणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना सीबीआयने अटक केली असताना महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपर फुटी मुळे संतापाची लाट पसरली आहे. महाराष्ट्रात शिक्षण मंत्र्यांचा शिक्षण विभागावर धाक नसल्याचे दिसून येते. म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने शिक्षण मंत्र्यांचा निषेध करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
👇 Click below to see Video 👇
यावेळी कोल्हापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण केसरकर युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय पवार, महानगरपालिका काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक रोहित कवाळे अजित पवार, भरत रसाळे, शशिकांत पाटील, संदीप बिरांजे, सचिन चौगुले, अभिजीत देठे, जय पटकारे, ईश्वर परमार, सिंधू शिराळे, संपतराव पाटील, दीपक थोरात, अक्षय शेळके, मयूर पाटील, संजय पटकारे, प्रथमेश कांबळे, रियाज सय्यद, आकाश शेलार, अशोक माळी, यशवंत थोरवत, युवराज लुगारे पाटील राकेश कांबळे मुजफ्फर टीनवाले, आदित्य कांबळे, विजय जाधव, महेश सूर्यवंशी, विजयानंद पोळ इत्यादी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या