इचलकरंजीत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार (परिसरात तणाव)
इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अल्पवयीन मुलींना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचा विनयभंग आणि अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
समीर अल्लाबक्ष मणेर (वय २१, रा. पोवार माळ) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलींना फूस लावून जाळ्यात ओढले होते. याप्रकरणी पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी दोन स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या आहेत.
तणावाची स्थिती:
सदरची घटना समोर आल्यानंतर स्थानिक हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले. संशयित आरोपी पळून गेला असताना त्याचा भाऊ जमावाच्या हाती लागला, त्याचा मोबाईल तपासला असता त्यात आक्षेपार्ह मजकूर आढळल्याने जमावाने त्याला चोप दिला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून संशयिताच्या घरापरिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या