Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

करवीर पोलीसांची कारवाई गोवा परदेशी मद्य वहानासह जप्त.

 


अवैद्यरित्या गोवा बनावर्टाची विदेशी दारुची वाहतुक करीत असलेल्या जीप गाडीसह इसमास पकडुन त्याचे गाडीमध्ये ८, ७७, २९०/- रुपयाची गोवा बनावर्टाची विदेशी दारु, जीप गाडी व मोबाईल असा मु‌द्देमाल जप्त करवीर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची कारवाई

पोलीस अधीक्षक श्री नीलोत्पल सो यांनी कोल्हापूर जिल्हयातील अवैध्य व्यवसायाबाबत माहिती मिळुन कठोर कारवाई करुन अवैध्य व्यवसायाचे समुळ उच्चाटन करणेबाबत सर्व पोलीस ठाणे अधिकारीयांना सुचना दिलेल्या होत्या.

मा. पोलीस अधीक्षक सो यांनी दिले सुचनाप्रमाणे करवीर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना त्याचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दि. १४/०६/२०२६ रोजी एक काळे रंगाची जीप गाडी क्र. GA-03-Y-1363 यामधून बिगरपरवाना, बेकायदा गोवा बनावटीचे विदेशी दारूचे बॉक्स भरून गारगोटी ते कोल्हापूर रोडने कोल्हापूरात येणार आहे अशी माहिती मिळालेने त्यांनी करवीर पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना माहिती दिली व सदर जीप गाडी मिळुन येताच तिर्चा खात्री करुन जीप गाडीवर व चालकावर कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.

गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे करवीर पोलीस ठाणे ह‌द्दीतील कोल्हापूर ते गारगोटी जाणारे रोडवर कळंबा नाक्याच्या पुढील बाजूस असले हॉटेल सुरभि हॉटेल समोरील रोडवर थांबुन वॉच करीत थांबले असता थोड्या वेळाने एक काळे रंगाची जीप गाडी क्र. GA-03-Y-1363 ही येत असताना

दिसली. ती मिळाले बातमी प्रमाणे जीप गाडी असलेची खात्री झालेने ती गाडी थांबवुन रोडच्या बाजूस घेतली. त्यानंतर चालकास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने आपले नाव गजानन दिनकर पाटील, वय ४९, सध्या रा. फ्लॅट नं. ६१०, ब्लॉक बी, विश्वकर्मा बी विंग, खानविलकर पेट्रोल पंपाचे मागे, कोल्हापूर मुळ रा. फ्लॅट नं. २ व ३, लक्ष्मी अपार्टमेंट, पटेल कॉलनी, टेंबलाई रेल्वे फाटक, रुईकर कॉलनी, कोल्हापूर असे सांगितले. त्यानंतर सदर गाडीमध्ये काय आहे याची पाहणी करण्यासाठी गाडी चालकासह गाडीची डिक्की उघडुन चेक केली असता त्यामध्ये खाकी रंगाचे व पांढ-या रंगाचे बॉक्स एकमेकांवर रचले असल्याचे दिसून आले त्यापैकी काही बॉक्स फोडून पाहिले असता त्यामध्ये गोवा बनावटीची विदेशी दारूच्या पॅकबंद काचेच्या व प्लॅस्टिक ७५० आणि १८० मि.ली. च्या लहान मोठ्या बाटल्या असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलीस उप निरीक्षक नाथा गळवे यांनी पंचासमक्ष चालक गजानन दिनकर पाटील यास सदर गोवा बनावटीची विदेशी दारू कब्ज्यात बाळगणेचा व तिची वाहतुक करण्याचा परवाना आहे काय? याबाबत विचारणा केली असता त्याने त्याचेकडे विदेशी दारू कब्ज्यात बाळगणेचा व तिची वाहतुक करणेचा परवाना नाही असे सांगितले. तसेच सदरचा माल कोणाच्या मालकीचा आहे व कोठून आणला याबाबत विचारणा केली असता त्याने सदरचा माल आपले मालकीचा असून तो स्वतः गोवा येथुन आणुन कोल्हापूर शहरात येऊन विक्री करित असल्याचे सांगीतले. त्यानंतर सदर जीप गाडी मधील सर्व माल खाली उतरून त्याचे मोजमाप केले असता त्यात १,६९, २९०/- रुपयाची विदेशी दारु, ७,००,०००/- रुपयाची जीप गाडी व ८०००/- रुपयाचा आयफोन मोबाईल असा एकुण ८,७७,२९०/- रुपयाचा मुद् देमाल मिळुन आला असुन त्याचेवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे.

सदरची कारवाई ही कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल साो, अपर पोलीस अधीक्षक,अण्णासाहेब जाधव सोो, उपविभागीय पोलीस अधिकारी, मा. सुजितकुमार क्षीरसागर सो यांचे मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी पोलीस उप निरीक्षक नाथा गळवे, पोलीस अंमलदार सुजय दावणे, सुभाष सरवडेकर, विजय तळसकर, प्रमोद पाटील, श्रीधर जाधव, दिग्वीजय पाटील यांनी केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या