व्याजाच्या पैशासाठी महिलेला देहविक्रीस भाग पाडल्याचा आरोप; तिघांना अटक.
मुख्य आरोपी सर्जेराव कुंभार अद्याप फरार
इचलकरंजी
हातउसने घेतलेल्या पैशांच्या व्याजासाठी विवाहित महिलेला देहविक्री करण्यास भाग पाडल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोन महिला आणि एका पुरुषाला अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सर्जेराव कुंभार हा अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक अडचणीच्या काळात पीडित महिलेने हातउसने पैसे घेतले होते. त्यानंतर व्याजाच्या रकमेसाठी सातत्याने तगादा लावण्यात आला. तसेच पीडितेला मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास देण्यात आल्याचा आरोप आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी महिलेला परपुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आले. या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात उज्वला दोरूगडे, युनूस सैफूद्दीन गवंडी( वय 57 राहणार सहरानगर रूई )आणि विनायक पवार यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मुख्य आरोपी सर्जेराव कुंभार याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
आरोपी उज्वला दोरूगडे हिची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या