Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

जागतिक रक्तदाता दिनानिमित्त उत्कृष्ट रक्तदान शिबिर आयोजक सन्मान कार्यक्रम संपन्न

 


जागतिक रक्तदाता दिनानिमित्त उत्कृष्ट रक्तदान शिबिर आयोजक सन्मान कार्यक्रम संपन्न


जागतिक रक्तदाता दिनानिमित्त विभागीय रक्तकेंद्र, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर यांच्या वतीने दिनांक १५ जून २०२६ रोजी अधिसेविका कार्यालय येथे उत्कृष्ट रक्तदान शिबिर आयोजक सन्मान कार्यक्रम व रक्तदान शपथ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूरचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. 

यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. भुषण मिरजे यांनी उपस्थितांना रक्तदान शपथ दिली. रक्तदान ही सामाजिक बांधिलकी असून प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान द्यावे, तसेच रक्तसाठा वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे उन्हाळ्यात रक्तसंकलन कमी होऊ नये म्हणून लोकांच्या मनातील पूर्वग्रह दूर करायला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

शरीर विकृती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. अपर्णा कुलकर्णी मॅडम यांनी उपस्थित सर्वांना रक्तदाता दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच हे काम असेच पुढे घेऊन जाण्यासाठी रक्तदान शिबिर आयोजकांना आवाहन केले.

     


 या प्रसंगी वर्षभर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रक्तदान शिबिर आयोजकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन, कोल्हापूर, श्री प्रेम प्रकाश मंदिर, गांधीनगर, सहजसेवा ट्रस्ट, कोल्हापूर, आमदार श्री पी. एन. पाटील (साहेब) युवा मंच, साडोली, लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना लि., सदाशिवनगर, कागल, श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि., कागल, श्री संग्राम बिल्ले (राशिवडे) व सौ. सुप्रिया गुदले (कागल) यांचा गौरव करण्यात आला.

         सन्मानित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून रक्तदान चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला फक्त शासकीय आणि CPR रुग्णालयाच्या रक्तपेढीलाच शिबिर देणार असल्याचे नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. सदानंद भिसे यांनी रक्तदान हे समाजसेवेचे सर्वोत्तम माध्यम असून रक्तदानामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळते. रक्तदान चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. तसेच थोरला दवाखाना म्हणून परिचित असलेल्या रुग्णालयात अनेक सर्वसामान्य रुग्ण येत असतात त्यांना आपल्या मध्यातून चांगली मदत होत आहे हे काम असेच पुढ घेऊन जाण्याचे आव्हान केले.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजसेवा अधीक्षक श्री. रोहित लोखंडे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. नेहा गुडाळे, सहाय्यक प्राध्यापक, विभागीय रक्तकेंद्र यांनी केले.

         कार्यक्रमास शरीरविकृती शास्त्र विभाचे सर्व अध्यापक, सहाय्यक प्राध्यापक डॉ.रवींद्र नामे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मा मुल्ला, डॉ. सुप्रिया लोखंडे, डॉ.आनंद वडजे,अधीपरिचारक श्री. रणजित केसरे, श्री. दत्तात्रय ऐवळे,प्रयोगशाळा तंत्रज्ञ सौ. विजया कुंभार, सौ सुनीता कर्णिक, सौ, वंदना पाटील, सौ. प्रियांका माने, सौ, आकांक्षा पाटील, श्री. प्रवीण जोशी, श्री.अण्णाप्पा हुगाई, श्री. अशोक पाटील, सहाय्यक श्री . उत्तम पाटील, श्री. राहुल धनवडे, श्री. प्रशांत काटकर, श्री. प्रतीक गोंधळी, श्री. अरुण कांबळे रक्तदाते,  समता फाऊंडेशन  प्रतिनिधी श्री. राजू नाडगिरे, समाजसेवा अधिक्षक श्री. शशिकांत रावळ, श्री . अजित भास्कर, श्री महेंद्र चव्हाण व रक्तदान शिबिर आयोजक उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रक्तकेंद्र प्रमुख डॉ राजेंद्र मदने सर यांचे मार्गदर्शन भेटले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या