हातकणंगले :मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ,यांनी हातकणंगलेकरांना दिलेला शब्द पाळत पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला . दि 9 जून हातकणंगले नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सक्षमीकरण व बळकटीकरणासाठी एकूण ₹६१ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली असून, मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी हातकणंगलेकरांना दिलेला शब्द पाळत पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
यामध्ये ₹१९ कोटी निधी कार्यान्वित करण्यात आला असून उर्वरित ₹४२ कोटींचा निधी केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेत समाविष्ट करून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या उपस्थितीत हातकणंगले नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अजितसिंह (काका) पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.
हातकणंगले नगरपंचायतीच्या निवडणुकीवेळी पाणीप्रश्न हा प्रमुख मुद्दा होता. त्यावेळी अनेक आश्वासने देण्यात आली होती. मात्र मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी हातकणंगले दौऱ्यादरम्यान ही योजना मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी दिलेला शब्द पाळत आज या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
या योजनेमुळे हातकणंगले शहराच्या पाणीपुरवठा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामासाठी खासदार धैर्यशील माने, नगराध्यक्ष अजितसिंह (काका) पाटील तसेच नगरपंचायत प्रशासन यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून हातकणंगलेच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या