तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली
कोल्हापूर :11 जून . गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणासंदर्भातील प्रकरणाची नियोजित सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी नगरविकास विभागाचे अपर सचिव असीम गुप्ता ,यांच्या अध्यक्षतेखाली वि डी ओ कोन्फरस द्वारा होणार होती व त्यामध्ये कोल्हापूर आयुक्त भारुड हि सहभागी होणार होते.
महापालिकेने संबंधित अतिक्रमणांबाबतचा सविस्तर अहवाल नुकताच शासनाकडे सादर केला आहे. या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली जाणार असल्याचे समजते.
तावडे हॉटेल परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे असल्याचा दावा महापालिकेने केला असून, अशा सुमारे २०४ बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित मालकांना ही बांधकामे स्वतःहून काढून टाकण्यासाठी २० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील पुढील कार्यवाहीकडे परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
--------------------------------------------------------


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या