Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

यार बना गद्दार,करवीर पोलीसांनी 24 तासात केला चोरीचा उलघडा



करवीर :-दिनांक ०६/०६/२०२६

बहिरेश्वर गांवातील चोरीचा २४ तासात उलघडा, मित्रानेच केली चोरी

करवीर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने चोरट्यास पकडुन त्याचेकडुन चोरीस गेलेल्या सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकुण १,४४,२५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

सविस्तर माहिती अशी की. ०४/०६/२०२६ रोजी शिव माळवाडी, बहिरेश्वर, ता करवीर या गांवात राहणारे संभाजी शिवाजी काशीद, हे त्याचे कुटुंबासह दि.०३/०६/२०२६ रोजी रानात भात पेरणी करणेसाठी गेले असताना त्याचे राहते घरात कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश करुन त्याचे तिजोरीतील ड्राव्हर मध्ये ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने हे चोरी करून घेऊन गेले बाबत करवीर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल होता.

          संशयित आरोपी :-वैभव विश्वास पडवळे, 

सदरचा गुन्हा दाखल झाले नंतर  पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांना चोरीच्या अनुषंगाने योग्य त्या सुचना व मार्गदर्शन केलेनंतर गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार हे बहिरेश्वर गांवात जाऊन माहिती घेत असताना पोलीस अंमलदार सोमराज पाटील व प्रकाश कांबळे यांना त्याचे गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, बहिरेश्वर गावातील चोरीचा गुन्हा हा फिर्यादी यांचा मित्र वैभव पडवळे, रा :बहिरेश्वर, ता करवीर याने केला असुन तो दि. ०५/०६/२०२६ रोजी खुपिरे फाटा येथे चोरी केलेले सोन्याचे व चांदीचे दागिने विक्री करणेसाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. सदर बातमीचा आशय मा पोलीस निरीक्षक  श्री रविंद्र कळमकर यांना दिली असता त्यांनी सदर बातमीची खात्री करुन तो मिळुन आलेस त्यास तावेत घेणेबाबत मुखशील आदेश दिला त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी खुपिरे फाटा येथे जाऊन सापळा लावुन थांबले असताना एक इसम वाकरे फाटा येथे एस टी बसमधुन उतरुन तो खुपिरे गांवचे दिशेने येताना दिसला तो गोपनीय बातमीदार याने दिले माहिती प्रमाणे वैभव पडवळे असल्याची खात्री झालेनंतर त्यास दुपारी १४.२० वाचे सुमारास वाकरे फाटा ते खुपीरे जाणारे रोडवरील महालक्ष्मी कॉलनी जवळ रोडवर त्यास सापळा लावुन पकडले व त्यास त्याचे नांव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव वैभव विश्वास पडवळे, वय २९, रा. कमानीजवळ, माळवाडी, बहिरेश्वर, ता करवीर जि कोल्हापूर असे असल्याचे सांगितले. लागलीच दोन पंचासमक्ष संशयित इसमनामे वैभव पडवळे यांची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात मिळाले प्लास्टीकच्या डबीमध्ये सोन्याचे झुवे फुलांचा जोड ६ ग्रॅम व सोन्याचे कानातील वेल जोड ४ ग्रॅम व चांदीचे पैजन जोड २६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकुण १,४४,२५०/- रुपयोच मु‌द्देमाल मिळुन आलेला असुन त्याचे अधिक तपास केला असता त्याने चोरीची कबुली दिलेली आहे.

सदरची कारवाई ही कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल साो, अपर पोलीस अधीक्षक, अण्णासाहेब जाधव सोा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मा. सुजितकुमार क्षीरसागर साो यांचे मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार रणजित पाटील, सुभाष सरवडेकर, सुजय दावणे, विजय तळसकर, सोमराज पाटील, प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण, विजय पाटील, योगेश शिंदे, श्रीधर जाधव यांनी केलेली आहे.

---------------------------------------------------------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या