युवा उद्योजक जयदीप सूर्यवंशी (दादा) यांच्या पाठपुराव्याला यश!
हातकणंगले तालुका :-मनपाडळे गावातील अनेक भागांमध्ये घरगुती वीजपुरवठा शेतीपंप वाहिनीवरून होत असल्याने नागरिकांना वारंवार लोडशेडिंग व वीजखंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. या गंभीर समस्येची दखल घेत युवा उद्योजक जयदीप सूर्यवंशी (दादा) यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने सातत्यपूर्ण पाठपुरावा करून ही मागणी आमदार मा. डॉ. अशोकराव माने साहेब यांच्याकडे मांडली.
या मागणीची सकारात्मक व गंभीर दखल घेत आमदार साहेबांनी महावितरण प्रशासनाला संबंधित भागातील घरगुती ग्राहकांना नियमित गावठाण वाहिनीवरून वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत पत्र दिले आहे. यामुळे मनपाडळे गावातील नागरिकांना भविष्यात अधिक दर्जेदार व नियमित वीजसेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विशेष सहकार्य :
शिवाजी दबडे (महाराज), शिवाजी ठाणेकर (ठाकरे), किरण सूर्यवंशी, रमेश भोसले, अरुण सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी (बापू), भारत सूर्यवंशी (आण्णा), तानाजी गुरव, अरुण गुरव, अनिल सूर्यवंशी, माजी ग्रामपंचायत सदस्य रतन वाघमारे, ग्रा.स. दिलीप कांबळे, शरद शिंदे, अविनाश सूर्यवंशी, शुभम सूर्यवंशी, सागर ठाणेकर, अनिल मेथे, राजेंद्र वाघमारे तसेच सर्व ग्रामस्थ.
यशस्वी पाठपुराव्यासाठी मार्गदर्शन करणारे, सहकार्य करणारे ग्रामस्थ, समितीचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार जयदीप सुर्यवंशी यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या