Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

टेण्युअर पूर्ण झाल्याने पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी मुंबई येथे बदलीवर


 परभणी येथील टेण्युअर पूर्ण झाल्याने पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी मुंबई येथे बदलीवर जात आहेत. आज सायंकाळी नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नालंदा बुद्ध विहार समितीच्या वतीने सरांना संविधान प्रास्ताविकेची फ्रेम देऊन प्रेमाचा निरोप देण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष करण गायकवाड, सेक्रेटरी भीमप्रकाश गायकवाड, कार्याध्यक्ष बी आर आव्हाड, संघटक सुदाम इंगोले, टीम नालंदाचे सदस्य विशाल शिंदे, विद्यासागर कांबळे, रमेश रावळे, विनोद मस्के आणि नालंदा बचत गटाचे अध्यक्ष डॉ प्रदीप साळवे यांची उपस्थिती होती.

सर परभणी सोडून जात आहेत; पण येथील कालावधीतील त्यांची अभिनंदनीय कारकिर्द परभणीकरांच्या कायम स्मरणात राहील. खाकी वर्दीचा अभिमान असला तरी वर्दीचा विनाकारण धाक न दाखवणारा कर्तव्यदक्ष, मिनमिळावू अधिकारी अशी त्यांची ओळख ! विशेषतः 'नालंदा'शी त्यांचं अत्यंत जिव्हाळ्याचे नाते !! आजही सरांनी ते बोलून दाखविले.

आज सरांना मी विचारले- सर 'नालंदा'साठी जाता जाता आपला संदेश काय ? सर क्षणार्धात म्हणाले- आपली नालंदा लायब्ररी तथा संशोधन केंद्र सुरू होईल तेव्हा होईल; तो पर्यंत सावित्रीमाई फुले मैदानावर असलेल्या 'नालंदा' परिसरातील पिंपळाच्या झाडाखाली हे काम लगेच सुरू करा.

अधिकारी येतात... जातात. हा व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. पण ज्या अधिका-यांनी सर्वस्तरातील जनतेचे मने जिंकली अशा सर्वसमावेशक मोजक्या अधिका-यांच्या यादीत पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांचे नाव ठळक अक्षरात नोंदवले गेले एवढे मात्र नक्कीच.

 भीमप्रकाश गायकवाड,

'मूकनायक',

रविराजपार्क, परभणी

Post a Comment

0 Comments