Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पणजी येथील राष्ट्रीय अधिवेशन पार

 


रुई गावचे सुपुत्र, ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब फास्के यांनी संपादित केलेल्या स्मरणिकेचे गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रकाशन

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पणजी येथील राष्ट्रीय अधिवेशनात विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नामदार उदय सावंत यांच्याकडून विशेष सत्कर

            डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्यावतीने पणजी, गोवा येथे सोमवारी आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात रुई गावचे सुपुत्र, ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब फास्के यांनी संपादित केलेल्या " डिजिटल मीडिया : नवे युग... नवे पर्व " या स्मरणिकेचे प्रकाशन गोव्याचे मुख्यमंत्री माननीय डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच अधिवेशनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नामदार मा. उदय सामंत यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे संस्थापक तथा केंद्रीय अध्यक्ष मा. राजा माने, गोव्याचे समाजकल्याण मंत्री मा. सुभाष फळदेसाई, खासदार मा. सदानंदशेठ तानावडे, आयुष्मान भारत योजनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मा. ओमप्रकाश शेटे, संघटनेचे गोवा प्रदेशाध्यक्ष मा. अनिल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. सतिश सावंत यांच्यासह विविध मान्यवर आणि महाराष्ट्र व गोव्यासह इतर राज्यातून आलेले 700 हून अधिक पत्रकार उपस्थित होते.

------------------------------------------------------------–----------------------------------------------------

                      @जाहिरात@

कावळा नाका मार्केट यार्ड रोड पासून 200 फूट अंतरावर 1000 फूट शेड ,भाड्याने देणे आहे.

        संपर्क:- राजु सुतार-+919881438109



Post a Comment

0 Comments