राज्यस्तरीय सरपंच परिषदेचा ग्रामरत्न पुरस्कार जितेंद्र यशवंत यांना बहाल.
गांधीनगर:- अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा आजी माजी ग्रामरत्न सरपंच पुरस्कार यावर्षी गडमुडशिंगी (ता करवीर) गावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य जितेंद्र तानाजी यशवंत यांना प्रदान करण्यात आला.
पाचगणी महाबळेश्वर येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष हुकुमचंद आमदेरा, शिवव्याख्याते संभाजी मोहिते तसेच महाराष्ट्र राज्य सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गडमुडशिंगी सह परिसरात राबवलेल्या सामाजिक तसेच विविध लोकउपयोगी उपक्रम, सार्वजनिक कार्यात दिलेले योगदान, कार्यकाळात शासन स्तरावरील विविध शासकीय योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य याची दखल घेऊन जितेंद्र यशवंत यांची ग्रामरत्न या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. दरम्यान जितेंद्र यशवंत यांनी सांगितले की सरपंच तसेच सदस्य कार्यकाळात प्रामाणिक सामाजिक कार्यात सहभाग घेतला तसेच नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले त्याचीच ही पोचपावती म्हणून या पुरस्कारासाठी निवड झाली.
फोटो ओळ:- गडमुडशिंगी ता. करवीर येथील माजी सरपंच व विद्यमान सदस्य जितेंद्र यशवंत यांना अखिल भारतीय सरपंच परिषदेचा ग्रामरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
------------------------------------------------------

Post a Comment
0 Comments