कोल्हापूर दि २८ -
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांना केंद्रात तिसऱ्यांदा मंत्रिपदा मिळाल्याबद्दल कोल्हापूरत भव्य सत्कार करणार आहोत असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ यांनी जाहीर केले*
सर्किट हाऊस कसबा बावडा येथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयु. दत्ता मिसाळ होते.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे मार्गदर्शन करताना म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातला पाण्यासाठीचा पहिला संघर्ष रायगड जिल्ह्यातील महाडच्या चवदार तळ्याकाठी केला समतेसाठी दिलेल्या या लढ्यास यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत आणि शेतकरी कष्टकरी महिला आणि उपेक्षित दलितांसाठी लढणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मास 200 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हे महात्मा फुलेंचे द्विशताब्दी जन्म वर्ष आहे याचा संपूर्ण महाराष्ट्रभर विचार पोहोचवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली समता मार्च संपूर्ण राज्यभर फिरणार आहे याच्या नियोजनाकरिता होणाऱ्या बैठकीला रामदास आठवले मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी बैठकीचे स्वागत प्रास्ताविक जिल्हा सचिव सतीश माळगे यांनी केले. बैठकीला उपाध्यक्ष संजय जिरगे, जिल्हा संघटक किरण नामे,बाबासाहेब कागलकर,बाळासाहेब कांबळे मुरगुड,दिलीप कोथळीकर, डॉ. कृष्णात सडोलीकर, बटू भामटेकर, कुंडलिक कांबळे रुपेश आठवले इचलकरंजी शहर अध्यक्ष श्रीनिवास कांबळे, ज्येष्ठ नेते जानबा कांबळे चंदगड, सुरेश कांबळे राधानगरी यांनी भाषणे केली आभार बाळासाहेब मुरगुडकर यांनी मानले.
----------------------------------------------------------


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या