Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

को म न पा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी एक मोठा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला

 


कोल्हापूर:-26 मे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या चारही विभागीय (प्रभाग क्षेत्र) कार्यालयांना अधिक सक्षम केल्यानंतर आता नागरिकांच्या तक्रारींवर जागेवरच तोडगा काढण्यासाठी आयुक्त मा. डॉ. राजेंद्र भारुड यांनी एक मोठा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. आठवड्यातून एक दिवस विभागीय कार्यालय स्तरावर होणाऱ्या 'अभ्यांगत दिनास' आयुक्त स्वतः उपस्थित राहून कोल्हापूरकरांशी थेट संवाद साधणार आहेत. महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आज आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी हे महत्त्वपूर्ण निर्देश दिले.

प्रत्येक प्रभागानुसार शौचालये, रस्ते, गटारी, ड्रेनेज दुरुस्तीच्या कामांची यादी करून त्यांचा प्राधान्यक्रम निश्चित केला जाईल. कार्यशाळा, परिवहन व इतर सर्व विभागांमधील स्क्रॅप (भंगार) साहित्याची यादी तयार करून त्यांचा पारदर्शक पद्धतीने लिलाव करण्याचे व त्यास व्यापक प्रसिद्धी देण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील मोठी उद्याने अधिक चांगल्या दर्जाची करण्यासाठी ती खासगी तत्त्वावर विकसित करण्याबाबत 'एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट' (EOI) मागविण्यात येणार आहेत. शहरातील अधिकृत फेरीवाल्यांना ओळखपत्र स्वरूपात विशेष स्टीकर देण्याचे निर्देश देण्यात आले असून नालेसफाईची कामे ३१ मे २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

या निर्णयामुळे नागरिकांना आपल्या तक्रारींसाठी मुख्य इमारतीमध्ये येण्याची गरज भासणार नाही आणि प्रलंबित नागरी प्रश्नांना तातडीने गती मिळेल.

---------------------------------------------------------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या