Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

रेल्वेत गुटखा विक्री..ते पण सि एस टी स्टेशन मध्ये. व ईतरठिकाणी ही.


मुंबई:-25 मे 2026

सि एस टी टर्मिनस मुंबई येथे (CST)  रेल्वे स्थानकावर महालक्ष्मी गाडीतून , कोल्हापुरास येत असणाऱ्या ट्रेन मधून मी स्वतः प्रवास करत होतो  , गाडी सीएसटी स्थानक मधून सुटण्याआधी गाडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ घेऊन व्यवसईक विक्रेते व्यवसाय करत असल्यचे  पहायाला मिळाले. पाणी बॉटल , हेडफोन , पापड ,वडा पाव,रेल्वेतील कैटिन देखील जेवण  विक्री करत होते.


मुंबई :रेल्वेत गुटखा विक्री करतान ,VIDEO

 काही वेळात  एक परप्रांतीय मुलगा गुटखा व विमल घेऊन बेधडकपणे बिंदास प्रवाशांना विचारत होता की विमल हवे आहे काय? हे दृष पहूण काही क्षण मी सुन्न झालो, मुंबईसारख्या ठिकाणी रेल्वेमध्ये बिंदास विमल विक्री करणारा हा व्यापारी एक विमल पुडी 30 रुपये प्रमाणे विक्री करत होता .

असं वाटत होतं की तो कोणाच्यातरी छत्रछायेखाली बिनधास्तपणे विमल विक्री करत असावा, अशा विक्रेत्यांना जाब  विचारणार तरी कोण ?   कारण रेल्वेमध्ये अशाा प्रकारे विक्री करणाऱ्यास कोणी परवानगी दिली रेल्वे पोलीस फोर्स  RPF, व जी आर पी एफ अशा दोन प्रकारचे रेल्वेसाठी विशेष पोलीस प्रशासन असताना, तरी देखील अशा गोष्टी घडतातच कशा ? पोटासाठी खाद्य पदार्थ विक्री करणार्यांना माझे दुमत नाही, पण रेल्वेत असा गुटखा, विमल विक्री करण कायद्याने गुन्हा आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो, गुटखा खाउन रेल्वेत पिचकाऱ्या मारतात,स्वछालय,वाश बेसन,टॉयलेट ,खिडकी,  घान करुन टाकतात . अशा प्रकरे गुठखा रेल्वेत  रेल्वेच्या आवरात  सार्वजनिक ठिकाणी विक्री  करणे गुन्हा आहे, व त्याला खत पाणी देणारा देखील तितकाच दोशी आहे.आशा विक्रेत्यांना वर व सं संबधित  जबाबदारी असणाऱ्या पोलीस पदाधिकारी यांच्यावर  देखील ताबडतोब गुन्हे दाखल झाले पाहिजे.

कल्याण स्टेशन मध्ये देखील असाच एक तरुण गुटखा रेल्वेत  विक्री करतान पहायाला मिळाला. नंतर पुणे स्टेशन आल्यावर देखील पुन्हा दुसरा तरुण  गुठखा विकण्यासाठी आला.जणू काय साखळीच आहे.हि साखळी विक्रेत्यांनचिच आहे का श्रय देणारर्याची पण आहे असा प्रश्न डोळ्या समोर उभा रहातो.

मुंबई पासून ते मिरज पर्यंत असाच प्रकार आसू शकतो. या मध्ये सामील साखळी मोडीत काढण्याची गरज आहे,रेलवे मंत्री, अन्न औषध मंत्री, ्रेल्वे पोलीस प्रशासन,मुख्यमंत्रीनि याकडे लक्ष द्यावे.जेनेकरुन पुन्हा असा प्रकार होता काम नये.

 देशात स्वछ भारत अभियान राभवले जाते ,आणी अशा लोकांना मुळे तरुण व्यसनाधीन होत आहे.व्यसन मुक्त देशात राबवली जाते हे  आणि जनू का कागदावरच फक्त ,सदरची बाब निंदनीय आहे , केंदत देखील हा मुद्दा खासदारांनी उपस्थित करावा.कारण यागोष्टी मुळे तरुण पिढी बिघडत चालली आहे. आळा घालण्यासाठी शासकीय यंत्रणांनी जागे होणे ही काळची गरज आहे.

आळा हा एकमेव पाउल.किव्हा गुटखा,तयार करणाऱ्या वर मोका सारखे गुन्हे दाखल करावेअसे माझे मत आहे. जागो देशवासियों जागो नहीं तो देर हो जाएगी.

----------------------------------------------------






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या