फोटो – करवीर पीठाची पालखी मिरवणूक शुक्रवारी मोठ्या उत्साहात निघाली.
आठवडाभर चाललेल्या उत्सवाची सांगता
कोल्हापूर, ता. 2 – शहराच्या प्रमुख मार्गावरून करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला गेलेली येथील श्रीमद आद्य शंकराचार्यांची पालखी मिरवणूक शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडली.
श्रीमद जगदगुरू आद्य शंकराचार्यांचा २५३४ वा जयंती उत्सव येथील पीठामध्ये २६ एप्रिल ते १ मे २०२६ या कालावधीत आयोजित केला होता. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी महाप्रसाद, पालखी पूजन आणि मिरवणूक होऊन उत्सवाची सांगता झाली.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी भक्तांच्या मोठ्या उपस्थितीत महाप्रसाद झाला. त्यानंतर दुपारी चार वाजता दत्तात्रय कर्चे (रा. पुणे) यांच्या हस्ते पालखी पूजन होऊन पालखी पीठातून बाहेर पडली. शुक्रवार पेठ, गंगावेस, रंकाळा बसस्थानक, ताराबाई रोडमार्गे महालक्ष्मी मंदिरात पालखी पोहचली. तेथे स्वामीनी अंबाबाई व परिसरातील इतर देवतांचे दर्शन घेतले. तेथून महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेस या मार्गे पालखी पुन्हा पीठात आली. यावेळी पालखीमध्ये घोडे, झांजपथक, हलगी अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात व स्वामींच्या जयघोषात पालखी निघाली. नयनरम्य आतषबाजीने पालखी मिरवणुकीची रंगती वाढली.
पीठाचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी, सचिव शिवस्वरूप भेंडे, सदस्य धनंजय मालू, प्रसाद चिकसकर, रामकृष्ण देशपांडे यांच्यासह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.
-----+--------------+-----------+------------+----

Post a Comment
0 Comments