कोल्हापूर दि:-4/4/26
भाजपा स्थापना दिवस
6 एप्रिल भारतीय जनता पार्टी पक्षाचा 46 वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून भाजपा कोल्हापूरच्या वतीने भाजपा स्थापना दिनानिमित्त *सक्रिय कार्यकर्ता संमेलनाचे* आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये *भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते यांचा सत्कार करून भाजपचा इतिहास, प्रवास व भाजपा सरकारने केलेल्या विकास कामांच्या प्रदर्शनीचे* उद्घाटन करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमासाठी *नामदार मा. चंद्रकांतदादा पाटील व खासदार धनंजय महाडिक* यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
तरी भाजपा लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
*दिनांक व वेळ : सोमवार दि. 6 एप्रिल 2026 रोजी दुपारी ठीक 2.30 वाजता.*
*ठिकाण : भाजपा कोल्हापुर जिल्हा कार्यालय, नागाळा पार्क, कोल्हापूर*
विजय महादेव जाधव जिल्हाध्यक्ष भाजपा कोल्हापूर यांनी आव्हान केले आहे.

Post a Comment
0 Comments