न्यायिक अधिकारी, वकील व न्यायालयीन कर्मचाऱ्यांची कोल्हापूरात आरोग्य तपासणी.
कोल्हापूर : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा न्यायालय, कोल्हापूर, जिल्हा बार असोसिएशन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती करवीर, सेवा रुग्णालय, कसबा बावडा आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या सहकार्याने जिल्हा न्यायालय, कोल्हापूर येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात न्यायालयीन अधिकारी, कोल्हापूर जिल्हा वकील संघाचे विधिज्ञ, जिल्हा सरकारी अभियोक्ता कार्यालयातील कर्मचारी, कौटुंबिक न्यायालयातील कर्मचारी तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. जिल्हा न्यायालयातील संकुलात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, ईसीजी, नेत्रतपासणी, किडनी इत्यादी तपासण्या विनामूल्य करण्यात आल्या. यावेळी तज्ञ डॉक्टरांनी हृदयरोग, आहार आणि ताण व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.
न्यायालयीन कामकाजाच्या धावपळीत वकिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते, हे लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
या शिबिरात जिल्हा न्यायाधीश क्र. १ श्रीमती आर. व्ही. अडोणे, न्यायिक अधिकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दीपली दोईफोडे, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री व्ही. आर. पाटील व पदाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्री प्रशांत वाडेकर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी श्री राजेश माने, नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री पुलकित खांबायते, सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री मनीष पाटील, सर्व सहभागी आरोग्य अधिकारी व कर्मचारी, प्रभारी प्रबंधक श्री श्रीकांत संकपाळ तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थित होते.
--------------------------------------------------------
---------------------------------------------------------



Social Plugin