कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत तिसरी केटीएस परीक्षा मोठ्या उत्साहात संपन्न .
"See Video"
कोल्हापूर महानगरपालिकेची 'केटीएस' परीक्षा उत्साहात संपन्न; टेंबलाईवाडी विद्यालयात यशस्वी नियोजन
कोल्हापूर (प्रतिनिधी):27/3/26
कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता तिसरीची 'कोल्हापूर टॅलेंट सर्च' (KTS) परीक्षा नुकतीच महानगरपालिका टेंबलाईवाडी विद्यालय या केंद्रावर उत्साहात पार पडली. या परीक्षेसाठी केंद्रांतर्गत येणाऱ्या विविध शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यातील स्पर्धात्मक वृत्ती वाढीस लागावी, या उद्देशाने महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी ही गुणवत्ता शोध परीक्षा घेतली जाते.या परीक्षेचे नियोजन केंद्र मुख्याध्यापक श्री विलास पिंगळे सर यांनी उत्तमरीत्या केले पर्यवेक्षक श्री चंद्रकांत कुंभार सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment
0 Comments