Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

कै. कांचनताई परुळेकर यांचा प्रथम स्मृतीदिन साजरा.



कै. कांचनताई परुळेकर यांचा प्रथम स्मृतीदिन
कोल्हापूर:- 28/3/26   स्वयंसि‌द्धाच्या  सचालिका कै. कांचनताई परुळेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनी त्यांच्या स्मृतीदालनाचे उ‌द्घाटन कोल्हापूरच्या महापौर मा. रूपाराणी निकम यांच्या हस्ते झाले. कांचनताईंनी 1992 पासून महिला सबलीकरणासाठी केलेल्या योगदानाब‌द्दल बोलताना महापौरांनी त्यांची दूरदृष्टी, त्याग, धाडस, अथक परिश्रम याब‌द्दल गौरवोद्‌गार काढले. ताईंच्या कार्याचा वारसा जपणे हीच ताईंना खरी श्र‌द्धांजली असे प्रतिपादन केले.

 गीताने कार्यक्रमाची सुरुवात होऊन ताईच्या कार्याचा आढावा व त्यांच्या जीवनपट चित्रफितीच्या माध्यमातून दाखवण्यात आला. स्मृतीदालन उभारण्यात देणगी दिलेल्यांचा गौरव करण्यात आला. सौम्या तिरोडकर यांनी प्रास्ताविक केले तर जयश्री गायकवाड यांनी आभार मानले.

१३ ग्रामीण भागातील १०० शेतकरी ताईसाठी सेंद्रिय शेती व विक्री व्यवस्थापन कार्यशाळेल घेण्यात आली. डॉ. दिलीप माळी सरांनी मार्गदर्शन केले. शेतकरी ताईला तिच्या कष्टाचे मोल मिळवून देण्याचा संकल्प ताईच्या स्मृतीदिनी करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी, देणगीदार, हितचिंतक, संचालिका व स्वयंस्िद्धा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

-----------------–------------------------------------

---------------------------------------------------------




Post a Comment

0 Comments