कोल्हापूर:- सावधान मा -आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार आता उघड्यावर कचरा टाकणाऱ्या वर होत आहे दंडात्मक कारवाई.
प्रभाग क्रमांक 17 मधील विक्रमनगर (टेंवलाईवाडी) येथे दिनांक 12/03/2026 रोजी एक परप्रांतीय युवक उघड्यावर कचरा फेकत असताना या भागाचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय संजय नायकवडी स यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी सदर इसमास पकडून इकडील आरोग्य निरीक्षक कार्यालयात घेऊन आले व त्यास ताकीद दिली तसेच इकडील प्रभाग क्रमांक 17 चे आरोग्य निरीक्षक यांनी सदर युवकास रुपये 1000 इतक्या रकमेचा दंड केला.
या अनुषंगाने इकडील प्रभाग क्रमांक 17 चे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय संजय नायकवडी स यांच्या माध्यमातून आवाहन करण्यात येते की, भागातील सर्व सुजान नागरिक, सामाजिक संस्था, तरुण मंडळाचे कार्यकर्ते तसेच सामाजिक, राजकीय तसेच सार्वजनिक कार्यक्षेत्रात वावरणाऱ्या सर्व कोल्हापूर वासियांनी आपल्या घरामध्ये दैनंदिन पणे निर्माण होणारा कचरा हा ओला कचरा व सुका कचरा असा वेगवेगळ्या करून महानगरपालिकेच्या येणाऱ्या घंटागाडीकडे द्यावा त्याचबरोबर चौकामध्ये, पडीक जमिनीवर, पटांगणावर तसेच इतर ठिकाणी उघड्यावर टाकण्यात येणारा कचरा बंद करावा व महानगरपालिकेच्या घंटागाडीकडे सोपविण्यात यावा जर कोणी व्यक्ती उघड्यावर कचरा फेकताना किंवा करताना आढळल्यास महानगरपालिकेतर्फे दंडात्मक कारवाई करणे सुरू आहे याचाच एक भाग म्हणून आज सकाळी परप्रांतीय युवक याच्यावर रुपये 1000 इतक्या दंडाचे कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे भागातील सर्व नागरिकांनी उघड्यावर कचरा फेकणे बंद करावे यामुळे भागातील फक्त कचराच कमी होणार नाही तर आरोग्याचे प्रश्न उदाहरणार्थ डेंग्यू, मलेरिया सारखे आजार कमी होण्यास मदत होणार आहे. व स्वच्छ सुंदर कोल्हापूर बनविण्यात हातभार लागणार आहे.
चला तर मग कचरा करणे थांबवू या व शहराचे विद्रुपीकरण रोखू या.
सदर च्या कारवाई चे भागात कौतुक होत आहे.
---------------------------------------------------------


This comment has been removed by the author.
ReplyDelete