हातकणंगले :-किणी हायस्कूल किणी येथील गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनीं यांचे केंद्र सरकार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (NMMS) शिष्यवृत्ती पात्र ठरल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.
या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे किणी हायस्कूल येथिल मुख्याध्यापक मा मलगुंडे सर, परिवेक्षक मा डि.डि.चव्हाण सर,मा योगेश कुलकर्णी सर व शिक्षक यांचा पालक म्हणून भेटा,शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आई आणि वडील मुलांना जन्म देतात पण शिक्षक विद्यार्थी घडविण्याचे काम करत असतात विद्यार्थी यांनी शिक्षकांविषयी आदर सन्मान करा, शिक्षकाच्या परिश्रम घेतल्यामुळे हे यश संपादन झाले हे जिवंत उदाहरण आहे असे शिक्षकांनचे कैतूक केले व पुढील शैक्षणिक कार्यासाठी सदिच्छा, शुभेच्छा दिल्या.
यावेळी किती हायस्कूल किणीचे शिक्षक,शिक्षीका,शिपाई, सौ माधवी दबडे,विद्यार्थी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments