Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

इंगळी ते हुपरी या जुन्या मार्गावरील इंगळी लगत असणाऱ्या विहिरीजवळ अचानक भूस्खलनमुळे

 


इंगळी जवळ असणारी विहार चे लगद भूस्खलन त्यामुळे ,इंगळी ते हुपरी जूणा रस्ता वहातुकीस बंद.

इंगळी ते हुपरी या जुन्या मार्गावरील इंगळी लगत असणाऱ्या विहिरीजवळ अचानक भूस्खलनमुळे रस्त्याचा काही भाग व त्यावरील दुकान गाळे विहिरीत कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सदरचा मार्ग देखील वाहतुकीस बंद झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच *मा. आमदार डॉ. सुजित मिणचेकर (संचालक - गोकुळ दूध संघ, कोल्हापूर)* यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली. त्याचबरोबर या घटनेत नुकसान झालेल्या सुलतान नायकवडे, असिफ पटेल, निजाम पटेल, खानसाब नायकवडे या नुकसाग्रस्त कुटुंबीयांचीही भेट घेतली.

 

 *यावेळी उपस्थित माजी सरपंच प्रकाश खुडे, माजी सरपंच बाबुराव पाटील, माजी ग्रामपंचायात सदस्य बाळासो कोळी (नेते) ग्रामपंचायत सदस्य मियालाल पटेल, माजी उपसरपंच प्रशांत कांबळे, किसन तिरपणकर, मारुती रांगोळे, नियाज नायकवडे, आयुब पटेल, बशीर नायकवडे, यासीन पटेल उपस्थित होते.*

Post a Comment

0 Comments