Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

कोल्हापूर पोलीस दलाकडुन " बेटी बचाव बेटी पढाओ " रॅलीचे आयोजन


कोल्हापूर पोलीस दलाकडुन " बेटी बचाव बेटी पढाओ " रॅलीचे आयोजन

हिला व बाल विकास मंत्रालयाच्या " बेटी बचाव बेटी पढाओ " या अभियानाला या वर्षी १० वर्षे पुर्ण झाली . त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख श्री महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली लिंगभेद चाचणीला प्रतिबंध करणेसाठी तसेच मुलींचे शिक्षणास व संरक्षणास प्रोत्साहन मिळणेकरीता कोल्हापूर जिल्हा पोलीस दलामार्फत “ बेटी बचाव बेटी पढाओ " या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .


 दिनांक ०४/०३/२०२५ रोजी सदर बाईक रॅलीचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी सकाळी ०८.३० वा च्या दरम्यान झेंडा दाखवून केले . कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील सुमारे १०० महिला अधिकारी व महिला अंमलदार या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या . ही रॅली पोलीस मुख्यालय येथील छ . शिवाजी महाराज पुतळा येथुन सुरु होवुन धैर्य प्रसाद मंगल कार्यालय चौक , कावळा नाका , दाभोळकर चौक , व्हीनस कॉर्नर , आयोध्या टॉकीज , महानगरपालिका , छ . शिवाजी महाराज पुतळा , भवानी मंडप , बिंदु चौक , कॉमर्स कॉलेज , दिलबहार तरुण मंडळ , साई मंदीर , टेंबे रोड , खासबाग मैदान , मिरजकर तिकटी , खरी कॉर्नर चौक , बिनखांबी गणेश मंदीर , महाद्वार रोड , पापाची तिकटी , पान लाईन , माळकर सिग्नल , सी . पी . आर . चौक , दसरा चौक , महाविर कॉलेज , रमनमळा , भगवा चौक कसबा बावडा ते पोलीस मुख्यालय येथे येवुन १०.०० वा . संपन्न झाली .


रॅली दरम्यान " मुलगी शिकली प्रगती झाली " , " लेक वाचवा लेक वाढवा- लेक घडवा " " मुलीला समजु नका भार , तीच जिवनाचा खरा आधार " , आता मनाशी ठरवा पक्क , शिक्षण हा मुलींचाही हक्क " इत्यादी घोषणा देवुन जन जागृती करण्यात आली . या जन जागृती रॅलीचा उद्देश हाच होता की , लिंगभेद चाचणीस प्रतिबंध होवुन मुलींचे जन्मदर प्रमाण वाढवावे आणि मुलींमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा .


बाईक रॅलीच्या उदघाटन प्रसंगी कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सो , अपर पोलीस अधीक्षक श्रीमती देसाई , पोलीस उप अधीक्षक श्रीमती पत्की आर्थिक गुन्हे शाखा , उप विभागीय पोलीस अधिकारी श्री अजित टिके शहर विभाग , श्री आप्पासो पवार शाहुवाडी विभाग , श्री सुजितकुमार क्षिरसागर करवीर विभाग , पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर स्थानिक गुन्हे शाखा , श्री सतिश होडगर सायबर सुरजितसिंह रजपुत मोटार परिवहन विभाग , श्री नंदकिशोर मोरे वाहतुक शाखा , श्री संतोष डोके शाहुपूरी पोलीस ठाणे , श्री कणेरकर लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे , श्री किशोर शिंदे करवीर पोलीस ठाणे , राखीव पोलीस निरीक्षक श्री माने , सपोनि श्री पाटोळे जुना राजबडा पोलीस ठाणे , श्री कोल्हाळ अनैतिक मानवी वाहतुक कक्ष , तसेच महिला अधिकारी , सहा पोलीस निरीक्षक श्रीमती मगदुम गोकुळ शिरगांव पालीस ठाणे , स्वाती यादव महिला सहाय्य कक्ष , क्रांती पाटील शाहुपूरी पोलीस ठाणे , सुप्रिया धुरंदे राजारामपूरी पोलीस ठाणे हे अधिकारी उपस्थित होते .


Post a Comment

0 Comments