दि. २३/०१/२५ रोजी सांगली मध्ये श्री फौंडेशन संचलीत "श्री अकॅडमी " या टेक्नीकल संस्थेमध्ये पदवी-प्रमाण पत्र वितरण कार्यकम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. खा. राजु शेट्टी ,मा.सौ. सविता लष्करे मॅडम (उपजिल्हाअधिकारी) भुसंपादन विभाग, मा. सौ. सुलोचना पाटील मॅडम सहा. शिक्षीका चिंचवाड हायस्कुल चिंचवाड, मा. डॉ. सौ. वैशाखी रत्नपारखी मॅडम व. मा. श्री. पांडुरंग जाधव साहेब राईज फौंडेशन सांगली हे लाभले होते. संस्थेचे रेफ्रिजरेशन विभागाचे HOD श्री. प्रशांत समुद्रे सरानी पाहुण्याचे ओळख, व प्रास्तावीक करून कार्यक्रमांची सुरुवात केली . संस्थेचे प्राचार्य, मा. श्री शितल भोजकर सरानी संस्थेची स्थापना व संस्थेचा प्रवास, वाटचाल याची सविस्तर माहीती दिली. मा. श्री. पांडुरंग जाधव साहेबानी त्याच्या मार्गदर्शन पर भाषणात सांगितले की लाज आणि भय न बाळगता काम करा ज्यांच्या जवळ स्किल आहे तोच जगात टिकणार आहे. टेक्नीकल व स्किल शिवाय पर्याय नाही. अनुभव खूप महत्वाचा आहे. आत्मविश्वास बाळगून शिका व कामं करा तुम्हाला यश निश्चित मिळेल. सुलोचना पाटील मॅडमच्या मार्गदर्शन भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिक पणे कष्ट करून क्षेत्रात नाव कमवावे असे सांगितले.
सांगलीच्या उपजिल्हाधिकारी सौ. लष्करे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्याचे सध्याचे महत्व सांगितले. ज्या क्षेत्रात आवड आहे त्याच क्षेत्रात शिक्षण घेऊन कार्य करण्यासाठी जापनीज पद्धती इकीगाई चे उदाहरण दिले. प्रमुख पाहुणे श्री. मा. राजू शेट्टी साहेबांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत असताना नोकरीं सोबत व्यावसायिक होऊन इतर बांधवाना ही कामं द्यावे व यशस्वी उद्योजक व्हावे.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. माने सरांनी केले.
सदर कार्यक्रमाचे नियोजना संस्थेचे सर्वं पदाधिकारी व स्टाफ यांनी उत्तमपणे केले.
या कार्यक्रमासाठी पुणे,बेळगाव,कोल्हापुर,बिड,अहमदनगर,येथे संस्थे मार्फत नामांकित कंपणीत जाँबलावुन दिलेल्या,विध्यार्थी,टेक्निकशियन यानांही प्रमाणपत्र देवुन गौरवीण्यात आले.पालकवर्गाचा मोठा सहभाग मोठ्या संखेने होता.
---------------------------------------------------
🇮🇳श्री.अकॅडमी,आमच्या संस्थेत,रेफ्रिजरेशन,अँड एअरकंडिशनर व मल्टींग स्केलिंग च्या कोर्ससाठी व्हिजिट करा. एसटी स्टँड जवळ, सांगली. माहिती👇 https://satarabazar.com/ad.php?id=MzMxMQ==
----------------------------------------------------





Post a Comment
0 Comments