स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची कारवाई
व्हिडिओ पहा,
दि ३० ०१ २०२५:-कोल्हापूर. मा पोलीस अधीक्षक , श्री महेंद्र पडत साठी यांनी कोल्हापूर जिल्हयातील अवैद्य व्यवसायाची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणे बाबत जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचेसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले आहेत.
मा . वरीष्ठांनी दिले आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे करवी माहिती काढुन कारवाई करणेचे काम चालू असताना पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना माहिती मिळाली की , कंजारभाट वस्ती , मोरेवाडी व साईनगर कंजारभाट वस्ती कणेरीवाडी येथे पहाटेचे गावठी हातभट्टीची दारु तयार करतात मिळाले माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे , पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व इतर पोलीस अमंलदार यांची पथके तयार करुन दि ३० ०१ २०२५ रोजी पहाटे राजारामपुरी पोलीस ठाणेचे हद्दीत ०७ हातभट्टीवर व गोकुळ शिरगांव पोलीस ठाणेचे हद्दीत ०४ हातभट्टीवर अशा एकूण ११ गावठी दारू तयार करणा - या हातभट्टीवर कारवाई केली आहे सदर परिसरात हातभट्टीची दारु तयार करणे करीता वापरत असणारे ५,६०० लिटर कच्चे रसायन १५४० लिटर पक्के रसायन , ५९२ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु व इतर साहित्य असा एकूण ३,३७,१६० / - रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन जागीच नाश केला आहे . सदरबाबत राजारामपूरी पोलीस ठाणे , कोल्हापूर येथे ०७ आरोपींचे विरुध्द व गोकुळ शिरगांव पोलीस ठाणे येथे ०४ आरोपीविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत.
सदरची कामगिरी मा पोलीस अधीक्षक साठी , श्री महेंद्र पडत यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर , सहा पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे , पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव , पोलीस अमंलदार संजय पडवळ , युवराज पाटील , संजय हुंबे , वसंत पिंगळे , अमित मदाने , दिपक घोरपडे , अमित सजे , संजय कुंभार , यशवंत कुंभार , हंबीरराव अतिग्रे , सागर माने , विजय इंगळे , विशाल खराडे , प्रविण पाटील , शिवानंद मठपती , महिला पोलीस अमंलदार प्रज्ञा पाटील व तृप्ती सोरटे यांनी केली आहे.


Post a Comment
0 Comments