Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

कोणे गँग " सहा महिन्या करीता कोल्हापूर जिल्हयातुन केली हद्दपार !!


इचलकरंजी व कुरुंदवाड परिसरातील " कोणे गँग " सहा महिन्या करीता कोल्हापूर जिल्हयातुन केली हद्दपार !!


कोल्हापूर:-दिनांक ३१/०१/२०२५ जिल्हयातील सामाजिक हितास बाधक व धोकादायक ठरणा - या गुन्हेगारीचे समूळ उच्चादणासाठी गुन्हेगारावर तसेच गुन्हेगारी टोळयांवर एमपीडीए तसेच उदपारीची कारवाई करणे बाबत मा.महेंद्र पंडित , पोलीस अधीक्षक सो , कोल्हापूर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत .


कोल्हापूर जिल्यातील इचलकरंजी , कुरुंदवाड शहर व परिसरामध्ये सार्वत्रिक हितास बाधक अशा स्वरुपाचे गुन्हयांना परिणाम देणा - या " कोणे गंग " या नावाने कुख्यात असलेल्या टोळीचा टोळी प्रमुख १ ) शुभंम संजय कोणे रा.चंदुर रोड बरगे मळा , इचलकरंजी , व टोळीचे सक्रिय सदस्य २ ) अर्जुन महेश निवाते रा . दाते मळा , इचलकरंजी , ३ ) चैतन्य उसे गणेश जटाप्पा माळी रा . जुना चंदुर रोड बरगे मळा , इचलकरंजी , ४ ) विशाल नरसिंग जाधव रा . लिंबू चौक संत मळा , इचलकरंजी ता . हातकणंगले , जि.कोल्हापूर यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व टोळीने परिसरातील वास्तव्यामुळे बाधीत झालेले सामाजिक स्वास्थ पुनःप्रस्थापित करण्यासाठी , सहा पोलीस निरीक्षक , कुरुंदवाड पोलीस ठाणे यांनी महाराष्ट्र पॉलीस अधिनियम १ ९ ५१ चे कलम ५५ प्रमाणे टोळी हद्दपारीचा प्रस्ताव मा . हद्दपारी प्राधिकारी तथा पोलीस अधीक्षक , श्री महेंद्र पंडित रूपो यांचेकडे सादर केला होता .

             कोल्हापूर जिल्हयाचे मा.हदगारी प्राधिकारी तथा पोलीस अधीक्षक , श्री महेंद्र पंडित सारे यांनी सदरच्या प्रस्तावांची निःपक्षपातीपणे चौकशी होणे करीता चौकशी अधिकारी म्हणुन उपविभागीय पोलीस अधिकारी , गडहिंग्लज विभाग , गडहिंग्लज यांची नियुक्ती केली होती . त्यांनी चौकशीअंती अहवाल मा.हदगारी  प्राधिकारी तथा पोलीस अधीक्षक सो , कोल्हापूर यांचेकडे सादर केला होता . चौकशी अधिकारी यांनी चौकशी दरम्यान व त्यानंतर वेळावेळी मा.हदगारी  प्रधिकारी तथा पोलीस अधीक्षक , कोल्हापूर यांचे समक्ष घेणेत आलेल्या सुनावणीवेळी टोळी प्रमुख व डोळी सदस्य यांना आपली बाजु मांडणेसाठी नैसर्गिक न्यायतत्त्वास अनुसरून पुरेशी संधी व अवधी दिला होता . घेणेत आलेल्या सुनावणीमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या माध्यमातून टोळीच्या अवैध गुन्हेगारी कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच सामाजीक स्वस्थास बाधा निर्माण करीत असल्याचे , सदर टोळीच्या परिसरातील वास्तव्यामुळे घर व धोका निर्माण झाल्याचे तसेच त्यांचा सातत्याने बेकायदेशीररितीने वागण्याचा हेतू असल्याचे स्पष्ट झाले .


सदर टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा , सार्वजनिक शांतता , सुव्यवस्था , नागरीकांचे जिवित व मालमतेची सुरक्षा असे सार्वत्रीक हित लक्षात घेवुन हद्दपार प्रधिकारी तथा पोलीस अधीक्षक , गा . महेंद्र पंडित सार यांनी दिनांक २ ९ / ०१ / २०२५ रोजी " कोणे गँग " पा टोळींचे प्रमुखासह ४ इसमांना कोल्हापूर जिल्हयाचे हद्दीतून सहा महिन्याचे कालावधी करीता हद्दपारीचे आदेश पारित केले पारित केलेल्या आदेशानी कुरुंदवाड पोलीस ठाणेचे सहा पोलीस निरीक्षक यांनी अंमलबजावणी केली आहे .

हसार कारवाई केल्लेले इसम हे कोल्हापूर जिल्ल्यामध्ये कोणाला दिसून आल्यास नजीकचे पोलीस ठाणेस अथवा नियंत्रण कक्ष ०२३१-२६६२३३३ येथे संपर्क करुन माहिती चाबी . माहिती देणा - याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे मा.महेंद्र पंडित , पोलीस अधीक्षक सो कोल्हापूर यांनी नागरीकांना आबादन केले आहे .




Tags

Post a Comment

0 Comments