Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

विद्यार्थ्यांनो आपल्या ध्येयाबरोबर पालकांची स्वप्नेही पूर्ण करा जिल्हाधिकारी


इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्याशी साधला संवाद


कोल्हापूर , दि . ४ ( जिमाका ) : विद्यार्थ्यांनो आपल्या ध्येयाबरोबर पालकांची स्वप्नेही पूर्ण करा असा सल्ला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांना दिला . व्हिएतनाम येथील होचीझीन्ह येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय अबॅकस पामा ग्लोबल इंटरनॅशनल यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत विविध २८ देशातील ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता . यामध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिकत असलेल्या व मास्टर एज्युकेशन अकॅडमी इचलकरंजीच्या १७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन चॅम्पियनशिप प्राप्त केली . याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार केला व त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले .

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले , ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी अबॅकसमध्ये एकाग्रता , चपळता व अचुकता दाखवून चॅम्पियनशिप मिळवली त्यानुसारच विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर इतर शालेय विषयांमध्ये तसेच खेळ व कला प्रकारांमध्ये यश मिळवून पालकांची इच्छा , स्वप्ने पूर्ण करावीत व समाजाचे , देशाचे नाव मोठे करावे . अशा अपेक्षा व्यक्त करुन विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या .


यावेळी उपशिक्षणाधिकारी शंकर यादव , संस्थेचे संचालक शिवराज पाटील , गणेश नायकुडे , डॉ . शरद जाधव , सविता भन्साळी , सुनीता गजरे , स्नेहा सूर्यवंशी , पूनम शेट्टी , मनोजकुमार अनुरे , जिल्हा परिषदेचे जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षणचे प्रवीण पवार व पालक उपस्थित होते . शरद जाधव यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले .




Post a Comment

0 Comments