मोटर सायकल चोरणारे एक आरोपी अटक , दोन बालके ताब्यात . दोन बुलेट व दोन स्प्लेंडर मोटर सायकल असा एकूण 3,40,000 / - रूपये किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई . मा . पोलीस अधीक्षक , श्री महेंद्र पंडित सो यांनी कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे बाबत तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच दुय्यम अधिकारी यांना वाहन चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देवून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या .
व्हिडिओ पहा
मा . पोलीस अधीक्षक सो यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक , श्री . रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा , कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व इतर पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला . सदर तपास पथकामार्फत मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचा प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार महेश पाटील व महेश खोत यांना खात्रीशिर गोपनीय माहिती मिळाली की , दोन अल्पवयीन मुलानी बुलेट गाडी चोरली असून ते सदर गुन्ह्यातील चोरलेली बुलेट मोटर सायकल घेवून आज दि .04.02.2025 रोजी कोल्हापुर सांगली जाणारे रोडवरील हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे गावचे हद्दीतील अॅक्सेल हॉटेल जवळ येणार येणार आहेत .
मिळाले माहितीचे अनुषंगाने तपास पथकाने दि . 04/02/2025 रोजी सापळा लावून दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना त्यांचे कब्जातील नंबर प्लेट नसलेल्या बुलेट मोटर सायकलसह ताब्यात घेतले . त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याचे कब्जात असलेली बुलेट मोटर सायकल त्यानी त्यांचा साथीदार स्वप्निल सुनिल नलावडे वय 19 , रा . शाहुनगर , हातकणंगले , ता . हातकणंगले , जि . कोल्हापुर याचे मदतीने चोरली असलेची कबुली दिली . त्यानंतर त्यांचेकडे सखोल तपास करुन त्यांनी चोरली आणखीन एक बुलेट व दोन स्प्लेंडर अशा 3 मोटर सायकली जप्त करुन त्यांचा साथीदार स्वप्निल सुनिल नलावडे वय 19 , रा . शाहुनगर , हातकणंगले , ता . हातकणंगले , जि . कोल्हापुर यास देखील ताब्यात घेतले आहे . नमुद इसमांकडुन उघडकीस आलेले गुन्हे खालील प्रमाणे .
अ.नं. पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर गुन्हा रजि नंबर जप्त मुद्देमाल
01)इचलकरंजी 19/2025 BNS - 303 ( 2 ) | बुलेट मो . सा . क्र . MH - 09 - EX - 4384
02) शिवाजीनगर 26/2025 BNS - 303 ( 2 ) बुलेट मो . सा . क्र . MH - 47 - M - 3184
03)शहापुर 38/2025 BNS - 303 ( 2 ) स्प्लेंडर मो.सा. क्र . MH - 09 - FC - 3683
04) शहापुर 387/2024 BNS - 303 ( 2 ) स्प्लेंडर मो.सा. क्र . MH - 09 - EB - 0570
सदरची कारवाई मा . पोलीस अधीक्षक , श्री . महेंद्र पंडित सो व मा . अपर पोलीस अधीक्षक , श्री निकेश खाटमोडे - पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . रविंद्र कळमकर , पोलीस उपनिरीक्षक श्री . शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार संजय कुंभार , प्रशांत काबंळे , महेश खोत , महेश पाटील , विशाल चौगले , प्रदीप पाटील , लखन पाटील , सागर माने , शुभम संकपाळ , संदिप बेद्रे , विजय ईंगळे , सुशिल पाटील , राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे .

Post a Comment
0 Comments