14 डिसेंबर:- सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्वसामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्त्यांची व्यापक मीटिंग संपन्न झाली
शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024
सदर मीटिंगमध्ये जिल्हा प्रशासन असेल मनपा प्रशासन असेल जिल्हा परिषद असेल प्रदूषण नियंत्रण मंडळ, सांगली जिल्हा पाटबंधारे विभाग
या प्रत्येक ठिकाणी नदी प्रदूषण असेल महापूर असेल ड्रेनेज समस्या असतील स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा असे याबाबत सध्या लोकनियुक्त सभागृह कुठेही अस्तित्वात नसल्यामुळे प्रशासकीय मनमानी कारभार चाललेला आहे
वारंवार विविध प्रश्नांसाठी समस्यांच्या बाबत पत्रव्यवहार करून सुद्धा व्यापक मीटिंग घेतली जात नाही नागरिकांचा सहभाग घेतला जात नाही याचा निषेध व्यक्त करण्यात आला
विविध भागातील समस्या ऐकून घेतल्यानंतर सर्वानुमते मंगळवार दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी महानगरपालिकेतील विविध प्रश्नांच्या बाबत आठ दिवसाच्या कालावधीचे सुरुवातीला पत्र देणे असे ठरले आहे
सदर आठ दिवसाच्या कालावधीमध्ये मीटिंग घेऊन समस्यांच्या वर उपाययोजना व तोडगा काढण्यात आला नाही तर महानगरपालिकेच्या दारात प्रति जनसभा आयोजित करण्यात येणार आहे
तसेच टप्प्याटप्प्याने मग प्रदूषण नियंत्रण महामंडळ असेल सांगली जिल्हा परिषद असेल सांगली जिल्हा पाटबंधारे विभाग असेल व जिल्हाधिकारी कार्यालय असेल अशा प्रत्येक प्रशासकीय कार्यालयासमोर प्रतीकात्मक प्रति जनसभा आयोजित करण्यात येणार आहेत
येथून पुढे सर्व प्रश्नांवर एकत्रितपणाने दबाव गट निर्माण करून काम करण्याचे निश्चित करण्यात आले आहे
आज पहिल्या टप्प्यात मीटिंग संपन्न झाली आहे हळूहळू या नागरिकांचा सहभाग वाढवण्यात येणार आहे ज्या ज्या नागरिकांना अशा पद्धतीने काम करायचे आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असे सुद्धा आवाहन करण्यात आले आहे
या वेळी सतीश साखळकर हनुमंत पवार पप्पू मजलेकर सर्जेराव पाटील प्रभाकर केंगार प्रदीप वायचळ राकेश दडनावर उमेश देशमुख साहिल मुजावर तानाजी रुईकर ऋषिकेश पाटील उत्तम जाधव संजय कोरे मयूर बांगर चंद्रकांत शिरगावकर मोहन चोरमुले बबन सुतार श्री गोपाळ मर्दा मारुती घावळ संजीव होरा सुयोग हावळ प्राध्यापक रजपूत प्रसन्न कुलकर्णी विजय खटावकर इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments