Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

खासदार महाडिक यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री नामदार अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या वेळी कोल्हापूर रेलवे विषयी चर्चा केली.

नवी दिल्लीत सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहेराज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री नामदार अश्विनी वैष्णव यांची भेट घेतलीत्यातून खासदार महाडिक यांनी कोल्हापूरशी निगडित रेल्वे प्रश्नांबद्दल नामदार वैष्णव यांच्याशी चर्चा केलीसध्या कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यागांधीनगर म्हणजेच वलिवडे स्थानकावर थांबत नाहीतगांधीनगर मधील स्थानिक रहिवासी आणि व्यापारी - उद्योजक यांची सोय लक्षात घेऊनसर्व एक्सप्रेस गाड्यांसाठी पुन्हा गांधीनगरचा थांबा सुरू करावाअशी मागणी खासदार महाडिक यांनी केलीतसेच मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम अधिक गतीने व्हावेयाकडे खासदार महाडिक यांनी लक्ष वेधलेदुहेरीकरणासाठी आवश्यक भूसंपादन झाले नसल्याने हे काम रेंगाळले आहेअसे नामदार वैष्णव यांनी स्पष्ट केलेत्यावर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून भूसंपादन प्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रयत्न करण्याचे अभिवचन खासदार महाडिक यांनी दिलेदरम्यान कोल्हापूर शहरातील बाबुभाई परिख पूल अत्यंत जुनाजीर्ण झाला असूनवाहतुकीसाठी अपुरा पडत आहेत्यामुळे बाबुभाई परीख पूलाला समांतर नवा पूल बांधावाकिंवा नवा उड्डाणपूल बांधावा अशी मागणीखासदार महाडिक यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केलीयाबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेऊन योग्य तो उपाय केला जाईलअसे नामदार वैष्णव यांनी स्पष्ट केलेयाशिवाय वंदे भारत एक्सप्रेस आणि सह्याद्री एक्सप्रेस मुंबई पर्यंत न्यावीअशी विनंती खासदार महाडिक यांनी केलीकोल्हापूरशी निगडित रेल्वेचे प्रश्न प्राधान्याने लक्ष घालून सोडवले जातीलअशी ग्वाही नामदार अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.



Post a Comment

0 Comments