तब्बल 5 लाख रुपयाची बक्षीसे असलेल्या झिम्म -फुगडी स्पर्धा 25 सप्टेंबर रोजी रामकृष्ण मल्टीपर्पज लोन वरती रंगणार आहे:- सौ अरुंणधती महाडिक.
धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी झिमा फुगडी स्पर्धा आयोजित केली जात आहे, सातत्यपूर्ण गेले पंधरा वर्षे झिमा फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात येत असून येत्या २५ सप्टेंबर 2024 रोजी बुधवारी मार्केट यार्ड येथील रामकृष्ण मल्टिपर्पज लोन वरती सदरच्या झिम्मा फुगडी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. महिलांना संसाराच्या व्यापातून विरुगळा मिळावा, त्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना देखील वाव मिळावा, म्हणून सदरची झिम्मा फुगडी स्पर्धा रंगणार आहे .या स्पर्धेसाठी तब्बल पाच लाख रुपयांची आकर्षक बक्षीसे हे ठेवण्यात आली आहेत तसेच ,सदरच्या स्पर्धेत युतींचा देखी कला गुणांचे प्रदर्शन व्हावे म्हणून 12 ते 18 वयोगटातील युवतींसाठी पन्नास हजार रुपयांचे वेगळी बक्षीस स्पर्धा घेतली जाणार आहे, अशी माहिती भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंणधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
👆 See Video 👆
गेले 14 वर्षापासून धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्था हि सामाजिक क्षैत्रात काम करणारी आग्रेसर ठरली आहे.
महिलांन च्या सुपत कलागुणांना वाव मिळावी म्हणून झिमा फुगडी स्पर्धेचेे आयोजन करत आसते, तसेच खासदार धनंजय महाडिक युवाशक्ती दही हंडी हि तरुण पिडीत क्रेझ निर्माण केले आहे.
खासदार धनंजय महाडिक युवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थांच्या अध्यक्ष सौ अरुंधती महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा प्रचंड यशस्वी व लोकप्रिय बनली आहे प्रत्येक वर्षी महिला स्पर्धकांची वाढती संख्या बघून गत वर्षी होणाऱ्या स्पर्धेत झिम्मा, घागर घुमविणे, उखाणे, सूप नाचविणे ,काटवण काणा ,जात्यावरी
ओव्या ,फुगडी घोडा, आणि पारंपरिक वेशभूषा अशा गटांमध्ये ही स्पर्धा होत असून या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांका ,25000/-हजार रुपये व सन्मानचिन्ह, दुसऱ्या क्रमांकासाठी 20,000/- रुपये आणि सन्मान चिन्ह . तिसऱ्या क्रमांकासाठी 15,000/- रुपये आणि सन्मान चिन्ह ,तर चौथ्या पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी 5001/- रु आणि सन्मान चिन्ह, तसंच 501/- रुपयापासून पाच हजार रुपयापर्यंतची वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत .12 ते 18 वयोगटातील मुलींसाठी खास 50 हजार रुपयांचे बक्षीस वेगळेेगळे सांघिक झिमा आयोजित करण्यातत आला आहे. सहभागी , महिलांसाठी चहा नाश्ता आणि जेवणाची सोय करण्यात आलेली आहे यासाठी सहज सेवा ट्रस्ट चे सहकार्य्य लाभले आहे.
महिला या दिनचर्यामध्ये नेहमीच गुरफटलेल्या असतात त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावी व मराठी संस्कृती जतन व्हावी महिलांना च्या शरीराचा व्यायाम व्हावा सांघिक भावना आणि आत्मविश्वास वाहोते., संस्था मोफत शेळी वाटप, मोफत आरोग्य शिबिर ,मोफत हेल्मेट वाटप, वृक्षारोपण महिलांसाठी रोजगार पुरक मोफत प्रशिक्षण, बचत गटांना मोफत स्टॉल, मीस व मिसेस भागीरथी स्पर्धा, युवतीसाठी मोफत व संरक्षण शिबिर, रक्तदान शिबिर, वाचनाची सवय लागावी, म्हणून गावोगावी वाचणालय ची स्थापना हजारो मुली व महिलांना याचा लाभ मिळालेला आहे .
स्पर्धेसाठी फॉर्म भरण्याची सोय तालुका निहाय प्रतिनिधींकडे आणि भागीरथी ताराराणी चौकातील कार्यालयामध्ये कोल्हापूर येथै उपलब्ध आहे शुक्रवार 20 सप्टेंबर 24 ही फॉर्म भरून देण्याची अंतिम तारीख आहे ,स्पर्धेसाठी सुमारे 40 परीक्षेत 15 निवेदिका आणि 60 स्वयंसेविकांची टीम सज्ज केली आहे. तसेच या स्पर्धेतचा आनंद, घर बसलेल्या महिलां ना चॅनल बी च्या माध्यमातून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे ,तसेच महिलांना प्रोत्साहन म्हणून टीव्ही मालिका मधील लोकप्रिय कलाकारासह चित्रपटातील कलाकार देखील या स्पर्धेत उपस्थित राहणार आहेत अधिक माहितीसाठी 0231-2625577 किंवा 9075217788 या नंबरवर संपर्क करा वा आसे , असे आव्हान सौ अरुंणधती महाडिक यांनी सांगितले सदरच्या पत्रकार परिषदेला सौ वैष्णवी महाडिक सौ मंजीरी महाडिक आदी उपस्थित होते.
______________________________________________________________________
___________________________________



Post a Comment
0 Comments