कचऱ्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करावा-प्रा.डॉ.तृप्ति करेकट्टी.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या माध्यमातून 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. यानिमित्ताने शिवाजी विद्यापीठच्या हिंदी विभागात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यामध्ये उस्फूर्तपणे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी विभागातील बाग, हॉल व वर्ग इ. ची स्वच्छता करण्यात आली.
या अभियान दरम्यान विद्यार्थी व प्राध्यापक यांना संबोधित करताना हिंदी विभाग अध्यक्ष प्रा. डॉ. तृप्ति करेकट्टी मॅडम म्हणाल्या की माणसाच्या जीवनात स्वच्छतेला फार महत्व आहे. माणसानी परीसर स्वच्छतेबरोबर विचारही स्वच्छ करावयास हवा. जीवनात स्वच्छता आली की निरोगी आयुष्य लाभते व जीवनाची गुणवत्ता सुधारते. स्वच्छतेमुळे जीवनातील अनेक समस्या समाप्त होतात.त्या पुढे म्हणाल्या की कचरा दुसर्याच्या दारात टाकून वैचारिक दारिद्र्य दाखवण्यापेक्षा माणसाने वैचारिक राहून कचऱ्यावर प्रक्रिया करून पुनर्वापरावर भर द्यावा.
या अभियान दरम्यान डॉ.संतोष कोळेकर,डॉ. प्रकाश मुंज, डॉ.गीता दोडमणी, डॉ.रमेश खबाले, डॉ.सुषमा चौगले, डॉ.अक्षय भोसले, डॉ. भाग्यश्री पुजारी, डॉ. सुवर्णा गावडे, जयसिंग कांबळे, अनिल मकर, डॉ. प्रकाश निकम इ. प्राध्यापक व विद्यार्थी-विद्यार्थिनीनी सहभाग घेतला होता.

Post a Comment
0 Comments