हातकणंगले. रुई - इंगळी मार्गावर वाढलेल्या वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी सुरळीत करणेसाठी सह्याद्री युवा फौंडेशनचा पुढाकार
महापुरामुळे पाणी संथ गतीनेउतरत आहे त्यामुळे रुई - इंगळी रस्ता वगळता सर्वञ रस्ते बंद असल्यामुळे त्याचा ताण रुई -इंगळी रस्त्यावर पडत असल्याने रोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे ती वाहतूक सुरळीत करणेकरिता रुई - कबनूर अवजड वाहनांची वाहतूक रुईफाटा मार्गे कबनूर वळवावी या करीता गावांमध्ये २ पोलिस कर्मचारी अथवा २ ट्राफिक पोलिस नेमणुक करून वाहतूक सुरळीत करण्यात यावी असे निवेदन हातकणंगले पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अशोक सायकर साहेब यांना सह्याद्री युवा फौंडेशन मार्फत देण्यात आले.

Post a Comment
0 Comments