कोल्हापूर:- दि 26 /8/24 - लहान मुली व महिलांवर होणाऱ्या अत्याचार संदर्भात कोल्हापूर मानव अधिकार रक्षक मंचच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांनी निवेदन देण्यात आले .
कोल्हापूर जिल्ह्यातील शिये तालूका करवीर येथील 10, वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्गुण खून करण्यात आला.तसेच बदलापूर येथील चिमुरड्या शाळेतील मुलींवरती लैंगिक अत्याचार ही करण्यात आला . कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवर अमानुष बलात्कार करून हाल हाल करून तिची हत्या करण्यात आली , आशी विकृति समाजात वाढती आहे .आशा गुन्हेगारी लक्षात घेऊन , गुन्हेगारांवर पोलिसांचा अंकुश राहिलेला नाही. अशा नरदमांना कुठोरात कठोर शिक्षा देऊन फास्टट्रॅक वर केस चालवली पाहिजे, जेणे करुण पुन्हा असे गुन्हे घडू नये. आसे निवेदनात म्हणले आहे .कोल्हापूर मानव अधिकार रक्षक म्हणजे कार्याध्यक्ष राजेश वाघमारे, सचिव उत्तम जाधव, डॉ. शांतिनाथ पाटील, सौ विजया कांबळे, सामाजिक कार्यकर्ते ,RTI मुकुंद मोरे संघटनेचे सल्लागार दाविद वाघमारे, हे उपस्थित होते.
----------------------------------------------------
---------------------------------------------------


Post a Comment
0 Comments