कोल्हापूर दि 3 जुलै24:-उचगाव ता:करवीर.
संसदेत राहुल गांधी यानी स्वतःला हिंदू समजणारे हिंसक आहेत आणि ते असत्य बोलत असतात अशा प्रकारची गरळ ओकली याच बरोबर हिंदू देवतांच्या प्रतिमा संसदेत दाखवत फडतूस राजकारणासाठी हिंदू देवतांच्या प्रतिमांचा वापर केला.. याचा जाहीर तीव्र निषेध छ.शिवाजी महाराज चौक उंचगाव येथे करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी कोल्हापूर दक्षिण, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, व सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भाजपा दक्षिण मंडळ अध्यक्ष अनिल पंढरे, माजी सरपंच अनिल शिंदे, राजेंद्र संकपाळ, दक्षिण मंडळ सरचिटणीस उमेश पाटील, भाजपा युवा मोर्चा दक्षिण मंडळ अध्यक्ष विजय गुळवे, विनायक जाधव, उमेश देशमुख, अर्जुन मुदुगडे, स्वप्निल अडसूळ, दीपक मुदुगडे, पांडुरंग घुणके,प्रितम साळुंखे,दामू अण्णा भडकुंबे, दिगंबर गावडे, रवींद्र एडके, चंद्रकांत चौगुले,अमोल भोसले, अनिकेत बिक्कड , विनायक माने, गणेश जाधव, मयूर चव्हाण, मयुरेश दनाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments