कटकारस्थानाने हिरावून घेतलेले मुख्यमंत्री पद शिवसैनिकांनी उध्दवजींना परत मिळवून द्यायचे आहे: उपनेते,जिल्हाप्रमुख संजय पवार
करवीर उचगाव .दोन वर्षांपूर्वी कटकारस्थान करून गद्दारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद हिरावून घेतले होते, आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उद्धव साहेब ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसैनिकांनी जीवाचे रान करावे असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते,जिल्हाप्रमुख संजय पवार (उद्धव ठाकरे गट) यांनी केले. उचगाव तालुका करवीर येथे ज्येष्ठ व गरजूंना छत्रीवाटप समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव होते.
यावेळी बोलताना राजू यादव म्हणाले की, दरवर्षी पक्षप्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांच्या वाढिवसानिमित्त समाजातील गरजू व ज्येष्ठ नागरीकांना करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने पावसाळी छत्र्यांचे वाटप केले जाते याप्रमाणेच वर्षभरामध्ये विविध सामाजिक समस्यांवर आंदोलने केली जातात तसेच अनेक सामाजिक उपक्रमही राबविले जातात.
हिंदू जनजागृती समितीचे बाबासाहेब भोपळे यांनी सुखी जीवनाचे कानमंत्र देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी सहसंपर्कप्रमुख विजय देवणे बोलताना म्हणाले दरवर्षी अशा प्रकारे छत्री वाटप करणे खरेच कौतुकास्पद आहे.
यावेळी उंचगाव गावप्रमुख दिपक रेडेकर ,उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले,शरद माळी यांनी आपली मनोगते व्यक्त केली .
यावेळी उंचगाव परिसरातील शंभर गरजू व जेष्ठ नागरिकांना पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उंचगावप्रमुख दिपक रेडेकर, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, शरद माळी, विराग करी, अरविंद शिंदे, सुनील चौगुले, योगेश लोहार, शिवानंद स्वामी, दिनेश संकपाळ,शिवाजी लोहार, अजित पाटील,अजित चव्हाण,शरद चव्हाण,संदीप शेटके, केरबा माने आदी शिवसैनिक, पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
___________________________
-------------------------------------------



Post a Comment
0 Comments