कोल्हापूर: राजारामपुरी येथील मुतारीची दूर अवस्था .कोल्हापूर शहरातील हल्ली मुताऱ्यांची संख्या कमी होत चालली असून एकेकाळी कोल्हापूर शहर म्हटले तर सर्व सुखसोयी ने समृद्ध असायचे
श्री महालक्ष्मी मंदिरासारख्याा ठिकाणी येणाऱ्या भाविकांची गर्दी वर्षभर खूपच असते तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे देवस्थान श्री ज्योतिर्लिंग हेही भाविकांना खूप आकर्षित करते.शहरात पुरुषांसाठी बऱ्याच मुुतारी व स्वच्छालय आहेत ,पण महिलांची कुचंबना नेहमीच होत राहिली आहे. महिलां, वयोवृद्ध व मुलींना या गोष्टी नेहमीच सामोर्य जावं लागत आहे.काही महत्त्वाच्या ठिकाणी मुताऱ्यांची तरतूद केली आहे. पण शहरातील बऱ्याच ठिकाणी मुताऱ्यांची सोयच नाही.पुरुष मंडळी आडोशाचा फायदा घेतो,या उलठ शहरामध्ये महिलांना अवघड परिस्थिती असते.
राजारामपुरी सारख्या गजबजलेल्या पहिल्या , गल्लीमध्ये एक मुतारी आहे ज्याची दूरअवस्था झाली असून ना स्वच्छता ना पाण्याचा निचरा होत आहे माणसांना घाणीतून मुतारीत प्रवेश करावा लागत आहे, तसेच आडोसा ही गरज आहे आरोग्य विभागाने तात्काळ लक्ष घालून देखबाल दुरुस्ती करावी अशी जनतेतून मागणी होत आहे.

Post a Comment
0 Comments