कागल, दि. 7/4/24
*समाजामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे दोघेही दोन्हीही समाज भावाभावांसारखे आहेत. या दोन्ही समाजामध्ये सलोखा व एकोपा नांदावा, अशी अपेक्षा खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी व्यक्त केली.*
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, खासदार प्रा. संजय मंडलिक हे दिवंगत खासदार स्वर्गीय कै. सदाशिवराव मंडलिक यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघेही या समाजकारणात एकत्र घडलो आणि वाढलोही. त्यामुळे ते माझे गुरुबंधू आहेत.
यावेळी माजी पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ, अन्वर मुश्रीफ, अबिद मुश्रीफ, नवीद मुश्रीफ, गोकुळ संघाचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, अतुल जोशी, नितीन दिंडे, प्रवीणसिंह भोसले, संजय चितारी, विकास पाटील, सतीश घाडगे, विवेक लोटे, नवल बोते, रणजीत बन्ने, बच्चन कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments