Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

हिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा :

 

भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

 

कोल्हापूर  दि.८ देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आपल्या पक्षाच्या प्रचाराच्या मुद्यावर विरोधी पक्षाच्या नेतेपदाधिकारी यांच्यावर आरोप प्रत्यारोप यावेळी होत असतात. परंतु समाजातील काही समाज कंटकांच्यावतीने जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार सध्या शहरात सुरु आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून निवडणुकीचे वातावरण बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रकार घडत आहे.  नुकतीच रोहितचा कुंभार या व्यक्तीने भारत माता, प्रभू श्रीरामलक्ष्मण यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट प्रसिद्ध केली आहे.  भारतीय जनता पार्टी सदर घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करीत आहे.

याविषयात सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधवप्रदेश सचिव महेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन सादर केले.

जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी संबंधित पोस्ट बाबत सविस्तर माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना निदर्शनास आणून दिली अशा लोकांमुळे समाजात तेढ निर्माण होत असून अशा लोकांना वेळीच कठोर शासन करण्याची मागणी केली. प्रदेश सचिव महेश जाधव यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून पंतप्रधान तसेच हिंदू देव देवींच्या विटंबनेच्या घटना येथून पुढे सहन केल्या जाणार नाहीत असे सांगत प्रसंगी भाजपा कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही असे नमूद केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सदर पोस्टची सत्यता स्वत: पडताळली याबाबत आपल्या सायबर क्राईमच्या अधिका-यांना सूचना करत सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी सरचिटणीस डॉ सदानंद राजवर्धनअॅड संपतराव पवारअमर साठेशैलेश पाटीलप्रदीप उलपेअनिल कामतअमेय भालकरसुनील पाटील, रविकिरण गवळीहर्षद कुंभोजकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments