चंदगड / दि 27/4/24
देशाचे नेते शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खूपसणारे आम्हालाही फसवायला मागं पुढे बघणार नाहीत त्यामुळे गद्दारांना त्यांची जागा दाखविण्याची हीच वेळ असून ती दवडू नका असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.हलकर्णी येथे इंडिया आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी काॅंग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील होते.
आमदार पाटील पुढे म्हणाले, यापुढे तालुक्याच्या आरोग्य,काजू व ऊस प्रश्नाच्या लढ्यात अग्रभागी राहू,असे सांगत मला कायम साथ देणाऱ्या ऐतिहासिक तालुक्याला दत्तक घेऊ, तसेच माझ्यावर या तालुक्यातील लोकांनी प्रम केल े असे जाहीर करताच टाळ्यांच्या कडकडाटात मध्ये त्याचे स्वागत करण्यात आले.इंडिया आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज म्हणाले बेळगाव-सावंतवाडी रेल्वेमार्ग, काजू उत्पादकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्य देऊ,असे अभिवचन दिले.गोपाळराव पाटील म्हणाले, कोणत्याही सत्तेशिवाय केवळ कार्यकर्त्यांमुळे मी राजकारणात टिकून आहे.त्यांना भावी काळात आमदार पाटील यांनी पाठबळ द्यावे अशी मागणी केली.यावेळी विजय देवणे, नंदिनी बाभूळकर,सुनिल शिंत्रे अप्पी पाटील,प्रभाकर खांडेकर, अँड.संतोष मळविकर,अँड. प्रशांत अनगुडे,रामराजे कुपेकर,जे.बी. पाटील, विष्णू कार्वेकर, विष्णू गावडे यांची मनागते झाली.
गेल्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार घोड्याकडे बघून रेड्याला मतदान केल्याचा घणाघात करत खासदार मंडलिकांवर माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगण यांनी तोफ डागली.

Post a Comment
0 Comments