हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत 697 लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर.
हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक अध्यक्ष झाकीरहुसेन भालदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीत प्राप्त झालेल्या एकूण 1007 प्रस्तावापैकी 697 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तसेच 310 प्रस्तावात त्रुटी असून सदर प्रस्ताव त्रुटींची पूर्तता करून तलाठ्यांमार्फत तात्काळ पुढील मीटिंग मध्ये सादर करण्याचे ठरले. यावेळी तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे, समिती सदस्य सर्वश्री महेंद्र शिंदे, बाळासाहेब गायकवाड, अमोल गावडे, दौलत पाटील, सुदाम इंगवले,संदेश भोसले, तानाजी ढाले, संजय देसाई, सौ. कविता सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments