Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय महिलांच्या ख्रिस्ती भजनी स्पर्धा मिरज येथे संपन्न.




मिरज :दि 8 मार्च 2023

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मिरज येथे सिनाय ग्रुप मिरज व होसान्ना महीला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ,डौक्टर के जी गोसावी येथे राज्यस्तरीय ख्रिस्ती भजन स्पर्धा आयोजित करण्यात आले. या वेळी विविध जिल्ह्यातून महिला भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला. एकूण 17 महिला मंडळीने सहभाग घेतला होता.

प्रथम क्रमांक शकायना ग्रुप कोल्हापूर व सुवर्ता भजनी मंडळ तारदाळ यांचा नंबर विभाजून देण्यात आला रुपये 10,000 तसेच स्मृतिचिन्ह देण्यात आले.


द्वितीय क्रमांक रुपये 7000 व सन्मान चिन्ह आराधना भजनी मंडळ मिरज व इस्लामपूर होली क्रॉस चर्च भजनी मंडळ.तृतीय क्रमांक होरेप चर्च कोल्हापूर व प्रार्थनालय भजनी मंडळ मिरज यांना रोख रक्कम 5000 व सन्मान चिन्ह देण्यात आली तसेच उत्तेजनात रोख रुपये 3000 व सन्मान चिन्ह ईमॅन्युअल चर्च मिरज यांना देण्यात आले. उत्कृष्ट गायक सुवर्ण घाडगे,उत्कृष्ट संघ म्हणून शांतीनगर भजनी मंडळ सांगली यांना मिळाले रोख रुपये 2000.
परीक्षक म्हणून रागिणी कांबळे या होत्या. सर्वांनी मंत्र मुग्ध होउन भजनी मंडळी च्या गायनाचा आनंद लुटला.या,कार्यक्रमास रजत लोंढे सिनाई ग्रुप व होसान्ना क्वायर ग्रुप 
 महिला मंडळाचे संस्थापक सौ राधिका लोंढे सौ.आशा सरोदे ,सौ.रुपाली कमले.ईत्यादी महिला भगीनी हाजर होत्या .संयोजकाचे कौतूक करून शेवटी आभार माणले.


Post a Comment

0 Comments