पन्हाळा तालुका:28जानेवारी, कोडोली या ठिकाणी राज्य स्तरीय ख्रिस्ती भजन स्पर्धा (मिस गोथे दुर्कस महीला मंडळ )शताब्दी महोत्सव निमित्ताने आयोजित करण्यात आली होती सदरची भजनी स्पर्धा ही दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आली कोडोली येथील प्रेसबिटेरीयन चर्च या ठिकाणी सदरची स्पर्धा संपन्न झाली ,राज्यातील विविध भजनी मंडळाचे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, या स्पर्धेसाठी एकूण 22 संघांनी सहभाग घेतला होता ,या स्पर्धेत परीक्षक म्हणून शिवकुमार कदम कोडोली तसेच जंगम हे दोन व्यक्ती लाभले. प्रेस बिटेरियन चर्चे मॉडरेटर श्री सुखानंद रणविसे तसेच सर्व सेशन महिला मंडळ यांचा कार्यक्रमास पार पाडण्यासाठी मोलाचा वाटा होता .
उत्कृष्ट तबलावादक म्हणून रांगोळी भजनी मंडळातील प्रथम क्रमांक आला, येलूर येथील भजनी मंडळास द्वितीय क्रमांक मिळाला, तसेच शांतीनगर सांगली येथील भजनी मंडळास तिसरा उत्कृष्ट तबलावादक हा क्रमांक पटकावला.
बेस्ट हार्मोनियम वादक म्हणून शांतीनगर भजनी मंडळ याला प्रथम क्रमांक मिळाला, द्वितीय क्रमांक युथ भजनी मंडळ यांना मिळाला, तृतीय क्रमांक शिनोय भजनी मंडळ मिरज यांना मिळाला.
उत्कृष्ट भजनी मंडळ बैठक व्यवस्थेसाठी पहिला क्रमांक शालोम चर्च येलूर यांना मिळाला, रुकडी चर्च कोल्हापूर यांना दुसरा क्रमांक. तसेच व्हॉइस ऑफ गोड यांना उत्कृष्ट बैठक व्यवस्था यांना तिसरा क्रमांक मिळाला.
उत्कृष्ट गायक म्हणून येलूर चर्च सांगली यांना प्रथम क्रमांक मिळाला.
शिनोय चर्च मिरज यांना द्वितीय क्रमांक मिळाला व तृतीय क्रमांक उत्कृष्ट गायक म्हणून युथ भजनी मंडळ रांगोळी यांना मिळाला.




Post a Comment
0 Comments