कागल: 25 नोव्हेंबर. हळदी येथे पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ आल्यानंतर येथील स्थानिक मराठा समाजाच्या युवकांनी "मराठा समाजाला आरक्षण मिळावे" या मागणीचे निवेदन त्यांना दिले. मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी येथे निवेदन स्वीकारून मराठा समाजाच्या युवकांशी संवाद साधला.
यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार संजयबाबा घाटगेही उपस्थित होते. मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मी सदैव मराठा समाजाबरोबर आग्रही आहे. मराठा समाजाच्या सर्वच आंदोलनांमध्ये मी सहभागी झालो आहे. तसेच त्यांनी यावेळी "एक मराठा लाख मराठा" अशा घोषणाही दिल्या...

Post a Comment
0 Comments