Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

महाराष्ट्रातील पहिली वाहतूक रिक्षा चालवणारी महिला

 
 
महाराष्ट्रातील पहिली महिला रिक्षा चालक . कोल्हापूर:दि 1,नोव्हेंबर आज-काल महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे .पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लावून काम करत आहेत.चूल आणि मुल ही प्रथा चालत होती.ती आता ती बंद झाली केवळ शिक्षणामुळे. माता,सावित्रीबाई फुले,यांनी मोठे धाडस करून महिलांनी शिक्षणासाठी पुढे यावे आणि या प्रमाणे आज महिला,सुशिक्षित होऊन घराबाहेर पडल्या,प्रगती झाली जगात इतकी मोठी प्रगती झाली आहे.याचंच एक उदाहरण म्हणून कोल्हापुरात रेखा दुधाने असणारी,एक धाडसी महिला जी राजारामपुरी मध्ये राहते,तिने पस्तीस वर्षांपूर्वी रिक्षा चालवण्याचे धाडस केले. इतकेच काय? तर ,या महिला भगिनीने 1985 साली रिक्षा चालवण्याची लायसन व परवाने काढला आहे. कौतुक असे की कोल्हापूर सारख्या ठिकाणी पस्तीस वर्षा पूर्वी रिक्षा चालवणे,हे म्हणावे तितके सोपे नाही. पण या महिलेते धाडसच म्हणून रिक्षा चालवण्याचे काम केले तिने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना असेही म्हटले की कोल्हापूरची जनतावाईट नाही ते नेहमी सहकार्य करत असतात आणि आपल्या हातात दांडक आसले तर कोणाला घाबरायचे असे,ही त्यांनी व्यक्त केले, लग्नानंतर त्यांनी रिक्षा चालवणे चालूच ठेवलेत्यांना त्यांच्या पतीने पाठबळ दिली आणि आज देखील ते तोच व्यवसाय करत आहेत.त्यांचे म्हणणे असे की महिलांनी या क्षेत्रात देखील कमी पडू नये, पुढे येऊन हा व्यवसाय स्वीकारावा, चंद्रकांत दादांनी या महिलेला रिक्षाही भेट दिली, आणि अशा या धाडशी महिलेला खरोखर सर्वांनी सलाम करायला हवाच.

Post a Comment

0 Comments