Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी, यांच्या हस्ते प्रमोद महाजन ग्रामीण, विकास कौशल्य केंद्राच उदघाटन.


 कोल्हापूर दि 19ऑक्टोबर :प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या उदघाटन सोहळ्यास काल आपल्या देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी
मोदी.
 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या उदघाटन सोहळ्यास काल आपल्या देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे  उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस, मा.अजित दादा पवार* यांच्या उपस्थित आँनलाईन पध्दतीने संपन्न झाला.
मा. पंतप्रधान यांच्या स्वप्नातील कुशल भारत घडविण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्रात ग्रामीण स्तरावर 500 कौशल्य विकास केंद्र मंजूर केली आहेत. महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील युवक- युवतींना रोजगार क्षेत्रातील उपयुक्त कौशल्य आत्मसात करून तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या या ग्रामीण स्तरावरील कौशल्य विकास केद्रांचे ऑनलाईन उद्घाटन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान *मा. नरेंद्रजी मोदी* यांचे हस्ते  *सीमसी स्किल प्रा. ली.* लकी फंक्शन हॉल, मुडशिंगी रोड, चेतन मोटर्स जवळ, उचगाव, ता. करवीर,जिल्हा कोल्हापूर   येथे संपन्न झाला.

 या कार्यक्रमा साठी  प्रमुख पाहुणे  मा.राज्यसभा खासदार मा.श्री धनंजय महाडिक , कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष, मा.राहुल रेखावर उंचगावचे सरपंच मधूकर चव्हाण, तंटामुक्त अध्यक्ष उमेश पाटील, सीमसी स्किल प्रा. ली. सेंटरचे केळूसकर , तलाह  इरफान मणेर, ,नामदेव वाईंगडे, महेश चौगले,शामराव यादव,श्रिधर
 कदम

,संदीप पाटील, ग्राम सेवक दत्तात्रय धनगर भाजपचे दक्षिण मंडळ अध्यक्ष अनिल पंढरे ,प्रविण चव्हाण, उदय पाटील, सुशांत पाटील,  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments